राजकिय

पिप्री अवघड वि.का.से.स.सोसायटीच्या चेअरमन श्री मच्छिद्र लांबे तर व्हा चेअरमन श्री रविद्र पवार यांची बिनविरोध निवड

पिप्री अवघड वि.का.से.स.सोसायटीच्या चेअरमन श्री मच्छिद्र लांबे तर व्हा चेअरमन श्री रविद्र पवार यांची बिनविरोध निवड

 

पिप्री अवघड सोसायटीच्या चेअरमन व्हा चेअरमन निवड सहाय्यक निंबधक विभागाचे निवडणुक अधिकारी श्री एस वाय आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनां 5 जुलै रोजी सकाळी ठिक 11 वाजता बिनविरोध पार पडली या निवडी मध्ये चेअरमन पदासाठी श्री मच्छिद्र चांगदेव लांबे यांचा एक जागेसाठी एकच अर्ज आला तर व्हाचेअरमन पदासाठी श्री रविद्र भाऊसाहेब पवार यांचा एक जागेसाठी एक अर्ज आल्याने निवडणु अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोशीत केले,लांबे यांची सुचना ,साईनाथ देवराव दोंड यांनी केली तर अनुमुदन बाळासाहेब नानाभाऊ लांबे यांनी दिले,

तर पवार यांची सुचना राजाराम भाऊ लांबे यांनी केली तर अनुमुदन महेद्र दिलीप लांबे यांनी दिले ,

या सभेसाठी नवनिर्वाचित संचालक ,श्री अनिलराव रायभान धसाळ,सौ रंजना साईनाथ लांबे

तर विरोधी गटाचे श्री जगन्नाथ काशिनाथ दोंड,सौ शांताबाई रावसाहेब पवार,श्री दत्तात्रय बाळकृष्ण कांबळे,श्रीअनिल भाऊसाहेब दोंड,श्री गोपीनाथ बळवंत शेंडे हे सर्व संचालक हजर होते,

राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या अग्रगन्य असलेल्या पिप्री अवघड विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणुक सन 2022/27 या कालावधीसाठी 13 जागेसाठी दिनांक 19 जुलै रोजी मतदान पार पडले या निवडणुकीमंध्ये दोन पॅनल उभे होते ,मुजेश्वर लोकसेवा मंडळाचे नेतृत्व लोकनायक ना.बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जन शक्ति पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी केले लांबे यांच्या विरोधात सर्व पक्षिय नेते व कार्यकर्ते एकत्र येऊनही , पिप्री अवघडच्या सुज्ञ मतदारांनी निवडणुकीत साम दाम दंड भेद या सर्वावर मात करत लांबे यांच्या मुजेश्वर लोकसेवा मंडळाचे 8 उमेदवार विजयी करुन स्पष्ठ बहुमत देऊन ग्रामपंचायत प्रमाणे एकहाती सत्ता देऊन मोठा विस्वास दाखवला,

 विरोधी सत्ताधारी अवघड बाबा जन-विकास मंडळाचे नेतृत्व डाॅ तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री अर्जुनराव बाचकर यांनी केले त्यांचे 5 उमेदवार विजयी झाले बाचकर हे विखे कर्डीले गटाचे असुन त्यांना ना.तनपुरे यांनीही मोठ्या प्रमानात आर्थीक मदत करुन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यानां बाचकर गटाचे सर्व उमेदवार निवडुण आणन्याचे आदेश देण्यात आले होते परंतु या निवडणुकीत बाचकर गटा कडुन मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करुनही सर्व पक्षिय प्रस्थापी पुढारी व त्यांचे कार्यकर्ते एकत्र येऊनही पिप्री अवघङच्या सुज्ञ मतदारांनी त्यांना ग्रामपंचायत प्रमाणे पुन्हा एकदा नाकारले ,

सुरेश लांबे हे प्रस्थापित पुढा-यांच्या विरोधात सतत शेतकरी व सर्व सामन्यांच्या प्रलंबित प्रश्नावर आंदोलन करुन आवाज उठवनारे सर्व सामांन्य शेतकरी कुटुबातील निपक्ष निरभिड स्वाभिमानी खंबीर नेतृत्व असल्याने,सुरेशराव लांबे यांचे कतृत्व वकृत्व नेतृत्व चारीत्र्य हे पहाता तालुक्यातील सर्व प्रस्थापीत पुढा-यांना आगामी काळात मोठे आव्हान आहे ,लांबे यांच्यावर शेतक-यांच्या साठी विविध पश्नावर आंदोलन केल्या प्रकरणी 353 व ईतर अनेक खोटे गुन्हे दाखल आहेत तर गेल्या डिसेंबर महीन्यात त्यांच्यावर विजबिल प्रश्नावर आंदोलन केल्या प्रकरणी 15 दिवस जेलमंध्येही रहावे लागले लांबे हे अन्याय अत्याचार भ्रष्ठाचाराच्या विरोधात असुन बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व असल्याने पिप्री अवघङ ग्रामपंचाय सरपंच पदी मुसलीम समाजाच्या सौ परविनबानो बादशहा शेख यांना सरपंच केल्याने अंतरगत नाराजीने 5 जनांचा पराभव झाल्याचे सभासद व गावातील नागरीकांन मंधे बोलले जाते,सुरेशराव लांबे यांच्या कार्याची संपुर्ण राहुरी तालुक्यात राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्य क्षेत्रात चर्चा आहे,

प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लोकनायक ना. बच्चुभाऊ कडु साहेब यांचा वाढदिवस केक आणुन त्यांची प्रतीमा संस्थेत लाऊन भाऊचां वाढदिवस साजरा करुन त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच

नवनिर्वाचीत चेअरमन मच्छिद्र लांबे,व्हाचेअरमन रविद्र पवार,व सर्व संचालक सरपंच सौ शेख ,निवडणुक अधिकारी आगळे साहेब ,संस्थेचे सचिव भारत ढोकणे ,

यांचा सभासद व नागरीक बंधु भगिनीनी मोठ्या संखेने हजर राहुन सत्कार केला व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या

व मुजेश्वर लोकसेवा मंडळाचे मार्गदर्शक सुरेशराव लांबे यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना तुम्ही ग्रामपंचायत प्रमाणे जो विश्वास आमच्या मंडळावर दाखविला त्यास आम्ही तडा जाऊ देनार नाही जिल्हा बॅकेच्या व शासनाच्या विविध योजना व शेती संबधीत पिक कर्ज मध्यममुदत कर्ज व गाय गोठा नविन कर्ज उपलब्ध करुण देऊ व ज्या थकबाकीदार व रेगुलर कर्जदार सभासदांना शासनाचे अनुदान मिळाले नाही त्याचा पाठपुरावा करुन लाभ मिळून देऊ कामकाजात कुठलाच भेदभाव होणार नाही संस्थेचा तालुक्या एक नंबरची आदर्श व सक्षम बनवु सभासदांना शेअर्स ठेवीवर जास्तीत जास्त डेव्हिडंड वाटप करुन काटकसरीत कारभार करु असे नविन पंचकमेटीच्या वतीने वचन दिले व सर्वाचे मनापासुन आभार मानले,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे