पोलिसांना मारहाण केल्याचा खोट्या गुन्हयातून धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांची निर्दोष मुक्तता.
पोलिसांना मारहाण केल्याचा खोट्या गुन्हयातून धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांची निर्दोष मुक्तता.
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- चौदा वर्षांपूर्वी हद्दपारीची नोटिस बजवण्याकरिता गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याच्या खोट्या गुन्ह्यातुन शिवसेना नेते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष धर्मरक्षक सागर बेग यांच्या सह एकजनाची श्रीरामपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.*
सन २०१२ मध्ये घडलेल्या या नाट्यमय घटनेची थोडक्यात समजलेली माहिती अशी की, तत्कालीन राजकीय दबावाखाली हद्दपारीची नोटीस बजावण्याच्या बहाण्याने आलेल्या पोलिसांनी आमच्यावर सागर बेग व अंकुश जेधे यांनी हल्ला केल्याची फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस येथे दिली त्यावरून गु.र.नं.२३०/२०१२ भा.द.वी.कलम ३०७,३५३,३३२,५०४,५०७,३४ व आर्म ऍक्टचे कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीरामपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यांचे समोर झालेल्या सुनावणीत गुन्हाच खोटा असल्याने व साक्षीदारांच्या साक्षीत तफावत आढळून आल्याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.एस. एन. साळवे यांनी सागर बेग यांचेसह अंकुश जेधे यांची निर्दोष मुक्तता केली.न्यायालयीन कामकाजात आरोपींच्या वतीने ऍड. पी. जी.गोराने व ऍड. अविनाश लिपटे यांनी काम पाहिले.



