पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल निलेश बोडखे यांना प्रशंसापत्र

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल निलेश बोडखे यांना प्रशंसापत्र
टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील भूमीपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी पोलीस दलातील केलेल्या तडफदार व उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देवून नूकतेच सन्मानीत करण्यात आले आहे. सध्या ते वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे कार्यरत आहे.
वणी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खूनाचा उलगडा कुठलाही पुरावा व साक्षीदार नसताने आपल्या कौशल्याने उघडकीस आणून तीन आरोपींना अटक केले. तसेच वणी पोलीस ठाण्यात प्रलंबीत असणाऱ्या गुन्ह्यातील ७१ प्रकरणे निर्गती करून प्रशंसनीय कामगिरी केली असल्याने त्यांना प्रशंसापत्र देवून सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना शहाजी उमप, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्याकडून प्रशांसपत्र देवून सन्मानीत करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल नाशिक ग्रामिण पोलीस दल तसेच टाकळीभान पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.