नागरिकांचे आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन सर्वच ठीकांनाच्या सर्वाजनिक ध्वनीक्षेपकावर मर्यादा आणि आळंदीत रस्त्यात चार चाकी पार्किंग करण्यावर निर्बंध बाबत केली मागणी*

*नागरिकांचे आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन सर्वच ठीकांनाच्या सर्वाजनिक ध्वनीक्षेपकावर मर्यादा आणि आळंदीत रस्त्यात चार चाकी पार्किंग करण्यावर निर्बंध बाबत केली मागणी*
प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी (दि.5) आळंदी देवाची येथील आजी-माजी नगराध्यक्ष आजी-माजी उपनगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक, शिवसेना
,राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, सर्वपक्षीय कार्यकर्ते,सजग नागरीक, यांनी आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन देत, आळंदीतील सार्वजनिक कार्यक्रमात लागणाऱ्या स्पीकरवर मर्यादा आणण्याची मागणी केली आहे,आळंदीत नेहमीच गर्दी असते, वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रम सर्वच प्रकारचे या ठिकाणी होतात, यामध्ये आवाजाची मर्यादा ओलांडत मोठ्या स्वरूपात ध्वनिक्षेपक लावून कार्यक्रम केले जातात, त्या कर्कश्य आवाजाचा त्रास बालक, वयोवृद्ध,आजारी,बायपास सर्जरी झालेले रुग्ण,यांना होतो, प्रसंगी बहिरेपणायेण्याची ही शक्यता नाकारता येत नाही, तसेच यामुळे अंगाचा थरकाप होणे, छातीत धडकी भरणे, डोके गरगरणे,अशी परिस्थिती असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे आळंदी पोलीस स्टेशनला देत यावर न्यायालयाच्या नियमाप्रमाणे निर्बंध असण्याची,आवाजाची मर्यादा असण्याची, मागणी केलेली आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस उभे असलेल्या वाहनांमुळे रस्त्याने चालता सुद्धा येत नाही, नागरिकांना जाता येते नाही आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या बाबतीतही लक्ष या निवेदनातून वेधण्यात आलेल आहे,
तसेच आळंदीच्या विविध रस्त्यांवर प्रदक्षिणा रस्त्या सहित इतर अंतर्गत रस्त्यांवरही चार चाकी वाहने लागतात, ” गाडी कुठेही पार्क करु नका रहदारीस अडथळा होतो,” असे सांगीतले की लोक भांडायला उठतात, रस्ता आहे लावणार असे वागल्याने .,वाहतूक कोंडी होते,नागरिकांना तसेच वाहन चालकांनाही त्रास होतो, याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देत याबाबत ताबडतोब कारवाईची मागणी केलेली आहे तसेच पुणे जिल्हा पालकमंत्री, पुणे जिल्हाअधिकारी , आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, ए पी आय शहाजी पवार ., गुन्हे शाखा एपीआय रमेश पाटिल यांना निवेदन देण्यात आले आहे,
या निवेदनावर आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डीडी भोसले, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, कृष्णा खोरे महामंडळ अध्यक्ष डॉ,राम गावडे, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे.,भाजपा अध्यात्मिक आघाडी चे अध्यक्ष संजय घुंडरे, दिलिप खळदकर, मंगेश तीतडे, मनोज कुऱ्हाडे, माऊली कुऱ्हाडे,हभप चैतन्य महाराज लोंढे, हभप रामकृष्ण गुजर, खेड तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे,सौरभ गव्हाणे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उत्तम गोगावले, आनंदा मुंगसे,योगेश दिघे,ज्ञानेश्वर गुळूंजकर, निखिल तापकीर, महेश गोरे,संतोष गोरे, सुदीप गरुड,ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, आदि व्यापारी नागरीक यांच्या सह्या आहेत