*अत्याचार प्रकरणात नवा खुलासा;आणखी एका आरोपीचा समावेश*

*अत्याचार प्रकरणात नवा खुलासा;आणखी एका आरोपीचा समावेश*
*एक आरोपी या प्रकरणात वाढला आहे लवकरच त्याला ताब्यात घेऊ अशी माहिती उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी दिली आहे* .
गेवराईतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बीड शहरातील तुळजाई चौकातील कॉपी शॉपमध्ये अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीसांनी आता कॉपी शॉप चालकालाही ताब्यात घेतले होते सचिन भास्कर खाकरे (वाखनातपूर ता. बीड) असे कॉफी शॉप चालकाचे नाव आहे. त्याचे शहरातील तुळजाई चौकात कॉफी शॉप आहे. रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहान लतीफ (दोघे रा. कुक्कडगाव ता. गेवराई) यांनी गेवराई शहरात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीचे तोंडाला रुमाल बांधून अपहरण केले. त्यानंतर रोहित आठवलेने या कॉफी शॉपमध्ये आणून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहान लतीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांच्या तपासात यामध्ये मोठा खुलासा झाला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,
यातील रोहित आठवले यास अटक केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान पीडिता ही सहा ते सात महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी कॉफी शॉपच्या मालकास ताब्यात घेतले होते तसेच काही दिवसापुर्वीच या पिडीतेने एका गोडस मुलाला जन्म दिला होता परंतू याच प्रकरणात पिडीतेची चौकशी केल्यानंतर आणखी एक खुलासा झाला असुन तसेच एक आरोपी या प्रकरणात वाढला आहे लवकरच त्याला ताब्यात घेऊ अशी माहिती उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी दिली आहे .
सूचना:- या डिजिटल मीडिया पोर्टल मध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या, विविध विषयावरील लिखाण, जाहिराती, डॉक्यूमेंट्री, यांच्या लिखाणाशी संपादक सहमत असतील असे नाही.कोताही वाद निर्माण झाल्यास तो फक्त राहुरी न्यायालया अंतर्गत चे मर्यादित राहिल…….