बेलापुरात नेहे याचा घरावर पुन्हा दरोडा नागरिक भयभीत
बेलापूर – बेलापूर गावातील ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घरावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला.नेहे यांच्या घरात प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करून तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जमा केला.त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे.यावेळी दरोडेखोरांनी बाळासाहेब नेहे यांच्या पत्नीच्या कानातील दागिने लवकर निघत नसल्याने “ कानातील दागिना निघत नसेल तर राहू द्या “ असे उद्गार मराठीत काढले व तेथून पळ काढला. काही दिवसा पुरवी असाच दरोडेा पडला होता त्यामुळे या प्रकाराची गावभर चर्चा होत आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवले त्यानंतर तात्काळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.संजय सानप व स्थानिक गुन्हे शाखा फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपासाची सूत्रे हाती घेतली.
यावेळी घटनास्थळाला श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री .संदीप मिटके यांनी देखील भेट दिली.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.