राजकिय
श्री संदिप डोळस यांची अशोक सहकारी साखर कारखाना कामगार सोसायटी संचालक पदी निवड….

श्री संदिप डोळस यांची अशोक सहकारी साखर कारखाना कामगार सोसायटी संचालक पदी निवड….
श्रीरामपूर तालुक्याचे लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे व युवा नेते नीरज भैय्या मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारेगाव येथील लोकसेवाविकास आघाडीचे प्रामाणिक ,निष्ठावंत तसेच सर्वसामान्य कुटुंबातील श्री.संदीप डोळस यांची अशोक सहकारी साखर कारखाना कामगार सोसायटी संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्रीफळ,शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करताना मुळा प्रवराचे संचालक युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब समवेत अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दौंड, पतपेढीचे संचालक मंडळ पदाधिकारी तसेच सुनील पटारे , डॉ.मंगेश उंडे, विकास दांगट, इतर सर्व कारेगाव ग्रामस्थ निवड झाल्याबद्दल उपस्थित होते.