राज्य उत्पादन शुल्क विभागाची २० जणांविरुद्ध धडक कारवाई..
राज्य उत्पादन शुल्क विभागाची २० जणांविरुद्ध धडक कारवाई..
विधानसभा २०२४ आदर्श आचार संहिता अनुषंगाने विशेष मोहीम राबवुन अवैध रित्या दारू विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर नेवासे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई करून २० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या अनुषंगाने नेवासे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी दि. १५ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर अखेर विशेष मोहीम राबवुन अवैध रित्या दारू विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर धडक कारवाई करत एकूण २० गुन्हे नोंद करून देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले. २० आरोपींना अटक करण्यात आले व दोन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहेत. तसेच मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत ४ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. एकूण मुद्देमाल २११७८०/- एवढ्या किंमतीचा मुद्देमाल कारवाई वेळी जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा अधिक्षक प्रमोद सोनोने उपअधीक्षक प्रविणकुमार तेली, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए जाधव, दुय्यम निरीक्षक पी एस पाटील, दुय्यम निरीक्षक आर. ए. घोरपडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे एच क्षीरसागर, महिला जवान एस एस राठोड, जवान वाहन चालक एस व्ही बिटके, जवान एन आर ठोकळ तसेच महिला जवान व्ही एस जाधव व जवान व्ही एच मेहेत्रे हे सहभागी झाले होते.