डाॅ.महावीरसिंग चौहान यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव

डाॅ.महावीरसिंग चौहान यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव
डाॅ.महावीरसिंग चौहान यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव दि.7/8/2022 रोजी महाराष्ट्र राज्य परदेशी राजपूत समाजाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा संचालक विद्यार्थी कल्याण व साॅईल सायन्स विभागाचे पदव्युत्तर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक कवी,गीतकार संगीतकार ,डाॅ.महावीरसिंग रामचरण चौहान यांना दि.7/8/2022 रोजी महाराष्ट्र राज्य परदेशी राजपूत समाजाच्या वतीने त्यांच्या आतापर्यत 30 वर्षात शैक्षणिक,सामाजिक,साहीत्त्यिक,सांस्कृतिक, क्रिडा व कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना चाळीसगाव, जावळा येथे समाजाच्या मेळाव्यात समाजभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री बि.डी.छानवाळ, परदेशी राजपूत समाजाचे अध्यक्ष व माजी एम.डी.कन्नड व बेलगंगा सह.साखर कारखाना यांच्या हस्ते डाॅ.महावीरसिंग चौहान यांचा शाल,पुष्पगुच्छ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी चाळीसगाव येथील परदेशी अँक्सीडेंट हाॅस्पीटलचे आर्थीपेडीक सर्जन तथा समाजाचे कार्याध्यक्ष माजी.जि.प.सदस्य जळगाव डाॅक्टर कर्तारसिंग बापू परदेशी ,पोलीस अधिक्षक श्री महीपालसिंग चांदा,प्रहार संघटनेचे अहमदनगर जिल्ह्राचे अध्यक्ष श्री विनोद परदेशी यांचे मोठे बंधू श्री मेजर सुनिल परदेशी जालना येथील शिक्षण संस्थेचे संस्थाप्रमुख व डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारीणी परिषद सदस्य प्रा. डाॅ भगवानसिंग डोभाल,डाॅक्टर जिवनसिंग परदेशी औरंगाबाद ,टेकवाडे येथील उद्योगपती श्री सुरेश परदेशी, पशुवैद्यकिय डाॅक्टर व विस्तार अधिकारी भडगाव ,संदीप चौहान व अनेक मान्यवर समाजबांधव ,बघिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.