कृषीवार्ता
जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेतली.*

*जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेतली.*
अवर्षण आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेऊन ज्या मंडळात निकषांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्या मंडळात सरसकट नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे क्रमप्राप्त आहे, हा त्यांचा अधिकार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या आहेत.
विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे,कंपणींच्या प्रतिनिधींनी सुधारणा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, शेतकऱ्यांबाबत निष्काळजी खपवून घेणार नसल्याचे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
#Dr_Pritam_Gopinath_Munde