आरोग्य व शिक्षणनोकरी
– न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

टाकळीभान प्रतिनिधी – न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी. प्राचार्य जयकर मगर , बापूसाहेब पटारे,विद्यार्थी प्राचार्या कु.गीते दिशा, उपप्राचार्य मगर दर्शन व पर्यवेक्षक बारसे निखील यांनी देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दूसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जयकर मगर सर,बापुसाहेब पटारे यांनी विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
विद्यालयातील पाचपिंड ए. ए. आणि सौ सोनवणे व्ही. एच. यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिक्षकांची भूमिका साकारून दिवसभर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा स्वानुभव घेतला.
शिक्षक दिन कार्यक्रमात दर्शन मगर, दिशा गीते,श्रावणी राऊत, विवेक शिरसाठ,आबुज स्नेहल, संस्कृती बोडखे, या विद्यार्थ्यांनी व शिक्षक प्रतिनिधी म्हणून पाचपिंड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर काळे एस.जी.सौ सोनवणे मॅडम, यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्राचार्य इंगळे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.सूत्रसंचालन कु.गायत्री कोकणे, कुदळ निलेश यांनी केले.तर आभार प्रदर्शन किरण संभाजी रणनवरे याने केले.