कु. रूपाली सोपान उघडे हिचे मुंबई पोलिसमध्ये निवड
कुमारी रूपाली सोपान उघडे हिचे महाराष्ट्र पोलीस मुंबई मध्ये घवघवीत यश. श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील कुमारी रूपाली सोपान उघडे महाराष्ट्र पोलीस मुंबई येथे यश मिळविले आहे अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील रुपाली हिने तिच्या आई-वडिलांच्या कष्टावर खरे उतरून दाखविले आहे रूपाली मुळात अत्यंत कष्टाळू स्वभावाची तिच्या या यशाबद्दल वांगी बुद्रुक गावातील एकमेव महिला पोलीस झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे त्या अनुषंगाने वांगी बुद्रुक ग्रामपंचायत वतीने तिचा सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी उपसरपंच गंगुबाई बाबासाहेब माने यांच्या हस्ते रूपाली सोपान उघडे हिचा सर्वप्रथम सत्कार करण्यात आला त्यानंतर रूपाली हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले माझ्या ह्या यशाला खऱ्या अर्थाने माझे आई आणि वडील यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी मला पाठबळ दिले नसते तर कदाचित मी या महाराष्ट्र पोलीस मुंबई येथे पोलीस या पदावर नियुक्त झाले नसते पोलीस होण्याची माझी इच्छा माझ्या वडिलांना सांगितली असताना त्यांनी माझ्या पाठीवर ती मायेचा हात फिरवत तुझी जर पोलीस होण्याची इच्छा असेल तर तुझ्या साठी अपार कष्ट सोसून तुझी इच्छा मी पुर्ण करेन वडिलांच्या या पाठबळामुळे मला बळ मिळाले आणि त्या अनुषंगाने मी पोलीस भरती च्या दिशेने वळले वडिलांच्या या पाठबळाला आणि त्यांच्या कष्टाला विफल होऊ द्यायचे नाही असा निश्चय करून मी पोलिस भरतीच्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली जेव्हा मी भरतीसाठी गेले असता माझ्या समोर मोठे आवाहन कोठे होते कारण तीन हजार जागांसाठी बारा लाख फॉर्म त्यात मुंबई शहरासाठी एन टी 13 जागा होत्या त्या जागे मध्ये मि 2 री आले त्यानंतर भर्ति साठी रनिंग घेण्यात आली त्यात 800 मुलींनी सहभाग घेतला होता त्यात मि 2 री आले आणि माझे मुंबई पोलीस मध्ये शिलेक्श झाले याचे पुर्ण श्रेय मि माझ्या आई वडिलांना देते त्या नंतर आशोक सहकारी साखर कारखाना निवडणूक 2021/26 च्या संचालक मंडळ निवडणूक मध्ये विजय मिळवला असे उमेदवार योगेश भाऊसाहेब विटनोर याचा ही ग्रामपंचायत वांगी बुद्रुक च्या वतिने सत्कार करण्यात आला या मागील निवडणुकीत सर्वात कमि वयात विजयी उमेदवार म्हणून बहुमान पटकावला आहे यावेळी योगेश विटनोर यांचा सत्कार वांगी खुर्द पोलीस पाटील दिनकर गायकवाड यांनी केला या प्रसंगी जेष्ट कार्यकर्ते रावसाहेब माने मा सरपंच संजय भिसे अखिल भारतीय मानवधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष धनंजय बाबासाहेब माने ग्रामसेवीका सौ बाचकर आण्णासाहेब चितळकर बबन आहेर अंगणवाडी सेविका मंदा पवार शिक्षक मते सर रावसाहेब विटनोर सोपान उघडे रामभाऊ बर्डे सिताराम बर्डे रामभाऊ वाघमोडे संपत हाळनोर जालींदर शेळके तसेच ईतर ग्रामस्त उपस्थित होते