विश्व आराध्य नवनाथांच्या भक्ती परंपरेतील क्षत्रीय कुंलवंशातील वंजारी समाज व संत अवजीनाथ महाराज, वामनभाऊ महाराज,ते राष्ट्र संत भगवानबाबा*

*विश्व आराध्य नवनाथांच्या भक्ती परंपरेतील क्षत्रीय कुंलवंशातील वंजारी समाज व संत अवजीनाथ महाराज, वामनभाऊ महाराज,ते राष्ट्र संत भगवानबाबा*
सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युग हे पुर्ण झाल्यानंतर जेंव्हा कलियुगाचा उदय झाला. त्यावेळी पृथ्वीवरील संसारी जीव यांची जीवनातील विविध सुख-दुःख अडचणी यामधून मुक्ती व्हावी.तसेच जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे असणारे आत्मस्वरूप ज्ञान सर्व साधारण माणसाला समजावं व त्यांच्या जीवनातील दुःख कमी व्हावं. या विविध अडचणींवर उपाय म्हणून बलशाली सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री दत्त महाराज यांनी जगद आराध्य नवनाथ यांना अनुग्रह दिला.आणि नवनाथ यांनी सृष्टीच्या कल्याणासाठी शाबरी मंत्रा ची निर्मिती केली. त्यासाठी नवनाथांनी सृष्टीवर अवतार धारण करून सृष्टीवरील कलयुगातील लोक समुहाचे कल्याण करण्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि शक्तीशाली मंत्रा ची निर्मिती कठोर आणि घनघोर तपस्या साधना करून सर्व देव देवता यांना प्रसन्न करून प्रसंगी युद्ध करून जनतेच्या कल्याणासाठी शबर मंत्राला सर्व देव देवता यांचे आशिर्वाद मिळवले . सहयभुत करून घेतले आणि सृष्टीच्या कल्याणासाठी सहयोग देण्याचे आश्वासन मिळवले . त्याचा वापर करुन कलीयुगातील अनेक पिढ्या लाभकारी होतील असे भव्य आणि दिव्य गुह्य ज्ञान सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री.दत्तगुरु व त्यांचे शिष्य नवनाथ सांप्रदाय ज्यामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालींदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ, नागनाथ ही नऊ रुप नवनाथ महाराजांची आहेत.बाल अवस्थेत असताना सांभाळ करणारे आई वडील यांची अज्ञाताने हत्या केली व चितेच्या जवळच असणारे भर्तरीनाथ शोकाकुल अवस्थेत पाहून त्याकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असणार्या व शुर-वीर म्हणून गणना असणार्या क्षत्रीय कुळातील वंजारी समाजातील काही लोक व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणाहून मार्गक्रमण करत होते .या समुहातील व्यापार्यांनी भर्तरीनाथ जे अगदी बाल्य अवस्थेत होते . त्यांना समजावून सोबत घेतलं व काही दिवस त्यांचा सांभाळ केला सहवासात राहून ज्ञान जाणुन घेतलं .व नंतर परस्परांना आदरपूर्वक निरोप देऊन उभयतांनी आप आपल्या दिशेने मार्गक्रमण केले.याच दरम्यान भर्तरी नाथ हे वंजारी व्यापारी समुहात वस्तीस असल्याने ते वंजारी समाज परिवारातील हिस्सा झाले होते. म्हणून पुर्वी पासुनच नवनाथ सांप्रदायाचा प्रभाव हा वंजारी समाजावर प्रामुख्याने जाणवतो. याचा संदर्भ श्री.नवनाथ अध्याय ग्रंथातील चोविसाव्या अध्यायामध्ये उल्लेख आला आहे .तो असा की,
तो मार्गकरून व्यावसायिक ॥ त्या वंजारे वृषभकटक देहानि ॥ परम शोक देशप्रती ॥ सांडिती झाली ॥26॥ तरीका विशेष । अग्नि लावूनि उभयतांस॥ शोकोही बुडाला ॥17॥ उभयतार्थ करिता दहन ॥ परी शोकविशोक पीछे प्राण ॥ म्हणे अहा तातमार्तन ॥ कैसें सोडिलें काननीं या ॥18॥ ऐसे रूदन करीत करीत ॥ पेटवूनि झाला शांतचित ॥ त्यांनी पाहून त्याचा शोक ॥ परम चित्ती कळवळले ॥100॥ म्हणती अगा भाटसुता । शोक करिसी अति वृथा ॥ होणार झालें विषयमाथा ॥ विधिअक्षरे नेमीत ॥101॥ ऐसें म्हणूनि बोध अपार ॥ उठविला त्याचा धरूनि कर ॥ मग सर्व घेऊनि मुक्कामावर ॥ आणिलासे भर्तरी ॥ 102 ॥ मुक्कामी राहूनि सकळ जन ॥ रात्री देऊनि अनुपान ॥ तयांचे काज ॥ काज होता तेज:पुंज ॥ सकळ चाहती॥05॥ यावरी व्यवसायिक ॥ धान्य भरूनि अति अमूप॥ उज्जयिनी शहर अवंतिक ॥ मार्ग धरिला तयाचा मार्ग सरतां वृषभकटका ॥ येऊनि पोहोचला ॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य दुसरे दिवशीं सर्वे घेऊन ॥ पुन्हां जात व्यवसायी ॥। 103॥ ऐसपरी सात पांच दिन । शोक करितां गेले लोटन ॥ मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण ॥ सहजस्थिती वर्ततसे ॥204॥ भग त्या व्यावसायिकां सहज॥ करूं लागला अवंतिका॥
पुढे चालून साधारणतः आजपासून तीनशे ते चारशे वर्षे अगोदर नवनाथांपैकी एक असणारे कानिफनाथ महाराज यांची श्री.क्षेत्र मढी जिल्हा अहमदनगर येथे समाधी असून कानिफनाथ महाराज यांनी संत अवजीनाथ महाराज यांना गुरु उपदेश करून गुह्य ज्ञान प्रदान केले. कानिफनाथ महाराजांकडून गुरु दिक्षा मिळाल्यानंतर वंजारी समाजातील गोरे कुटूंबातील वीरगाव ता.अकोले जि.अहमदनगर येथे जन्म घेतलेले संत अवजीनाथ महाराज यांना सुद्धा नाथ सांप्रदायाचा वारसा पुढे चालवण्याची संधी मिळाली त्यांनी त्यांना मिळालेले गुह्य ज्ञान लोककल्याणासाठी वापरात आणले आणि आपले अवतारकार्य पुर्ण होताच मिरपूर लोहारे ता.संगमनेर जि.अहमदनगर येथे दसर्याच्या शुभदिनी संजीवन समाधी घेतली . एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात बीड जिल्ह्यातील शिरूर जुना गेवराई तालुक्यात जन्माला आलेले अवतारी सदपुरूष सद्गुरु ह भ प संत वामनभाऊ महाराज यांनी नवनाथा पैकी असणारे गहिनीनाथ महाराज यांची संजीवन समाधी असणारे स्थळ चिंचोलीनाथ येथे आपल्या जीवनकार्याची सुरुवात करुन भव्य अशा गहिनीनाथ गडाची निर्मिती करुन लोकोद्धाराचे कार्य आयुष्यभर केले. तद याच ठिकाणाहून काही अंतरावर प्रभु रामचंद्र यांच्या पावण स्पर्शाने पुणित झालेल्या भुमित म्हणजे सावरगाव ता पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी अवतारी सदपुरूष राष्ट्रसंत ही उपाधी प्राप्त झालेले भगवानबाबा यांनचा जन्म झाला .अखंड ब्रह्मचर्या व्रत पालन करत नाथ सांप्रदायातील नवनाथाप्रमाणेच कठोर आणि घनघोर तपश्चर्या ध्यानधारणा अंबाजोगाई नगरीच्या बाजूला असणार्या मुकूंदराज महाराजांच्या पवित्र अशा समाधीस्थळाच्या बाजूला गुहेत वास्तव्यास असताना साक्षात आपल्या तपोशक्तीने परस्पर विरोधी असणारे हिंस्त्र प्राणी तसेच विषारी सर्प यांना एकत्र बसवून आपल्या आजूबाजूला खेळवण्याचे सामर्थ्य ईश्वराची आराधना करून कठोर अशा तपोशक्तीने नवनाथांचा जप तप मंत्र शक्ति व गुरू अनुग्रह घेऊन संत भगवान बाबा यांना सुद्धा नवनिधी व अष्टसिद्धी प्राप्त केल्या.या सामर्थ्याचा उपयोग लोककल्याणासाठी बाबांनी केला . अनेक लोकांच्या जीवनातील दुःख दुर केले . अनेक लोकांना सदमार्ग वर आणलं.अनेकांच्या जीवनात क्रांतिकारी बदलथ घडवले.अनेक ठिकाणी नवनाथा प्रमाणेच काही लोकांना ईश्वराचे अस्तित्व दाखवण्यासाठी यमाला सुद्धा माघार घ्यावी लागली ज्या शरीरातील प्राण निघून गेले त्या शरीरा मध्ये सुद्धा तपोबळाने चैतन्य निर्माण केले.समाज सुधारणा करत असताना ज्ञान आणि शिक्षण व सदमार्ग आचरण याला महत्त्व देत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचली. भारतीय स्वतंत्रता संग्राम असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये आध्यत्मिक ज्ञान मार्गावरून सुवर्ण अक्षरांनी लिहावं असं योगादान दिले.आणि धार्मिक कार्य पुढे असंच अखंडीत चालू राहव म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात नावलौकिक झालेला भव्य दिव्य असा धौम्य गड निर्माण केला .धैम्य गडाचे भगवान गड असं नामकरण हे तात्कालिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडावर उपस्थित लाखो लोकांच्या साक्षीने राज्याचा मुख्यमंत्री , लोकभावना ,व बाबांचे अलौकिक कार्य याचा गैरव म्हणून धैम्य गडाचे भगवान गड नामकरण केले .जो भगवान गड आज महाराष्ट्रातील सामाजिक, आध्यत्मिक ,पटालावरील केंद्र बिंदू आहे. एकंदरीत वंजारी समाज आणि नवनाथ भक्तीसांप्रदाय हा परिवारीक आणि घनिष्ठ असा संबंध आहे.