धौम्यगड ते भगवानगड नामकरण वर्धापन दिन*

*धौम्यगड ते भगवानगड नामकरण वर्धापन दिन*
एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात तत्त्वज्ञानी ,समाज सुधारक,शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे आधुनिक भगिरथ राष्ट्र संत भगवान बाबा आणि बाबांच्या अथक प्रयत्नातुन निर्माण झालेला धैम्य गड याच धैम्य गडाचं नामकरण 1मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झाल हा दुग्ध शर्करा योग आणि तेही राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री महाराष्ट्र भूषण यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते हा योग आध्यत्मिक ज्ञान जगतात दुर्मिळच .भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असणार्या धौम्यगडचा गड भगवान गड असं नामकरण दिनांक 1 मे 1958रोजी धौम्यगड येथिल जाहिर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नामकरणाची घोषणा केली.
मागिल चार दशकांपासून महाराष्ट्र च्या सामाजिक अध्यात्मिक आणि राजकिय जीवनात वेगळं वैभव असलेला आणि राज्यात लाखोंच्या संख्येत भक्त गण असणारा देशाच्या पातळीवर नावलौकिक मिळवलेला भगवान बाबांनी वेदशास्त्राच्या मधयामातुन निर्माण केलेला व दिवसेंदिवस नाव लौकीक होत असलेला महाराष्ट्र राज्यातील पाथर्डी तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीच्या बाजुच्या प्रचंड झाडीत डोंगर माथ्यावर विस्तारलेला आणि राष्ट्रीय महामार्गावर अगदी जवळ महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा दर्जा प्राप्त झालेला दैदिप्यमान भगवान गड नामकरण दिनांक 1/5/1958 आजच्या दिवसाची पार पडला.
साधारणतः इस 1950 चा काळ न्यायालयाचा वारसबाबतचा निर्णय भगवानबाबांनी मान्य करुन नारायणगड सोडला, आपले गुरू माणिकबाबा यांच्या समाधी समोर प्रणाम करून अंगावरील दागिने कपडे त्या ठिकाणी काढुन शेजारी उभा अंगरक्षक त्यांच् कडील रूमाल शरीरावर गुंडाळून तेथुन बाहेर पडल्यावर हिमालयात जाऊन तप करण्याचा निश्चय केला दरम्यान जातांना खोकरमोह येथील भाविक भक्त यांनी पर्यायी गड निर्माण करावा अशी विनंती केली पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले परंतु बाबा ऐकण्यासाठी तयार नव्हते आर्वी मार्गे निघाले खरवंडीला पोहचले गावात वार्ता पसरली गावचे पाटील बाजीराव पाटील आपल्या घरी घेऊन गेले बाजीराव पाटील यांच्या आई मुळाच्या नेकनुर च्या बंकट स्वामी महाराज यांच्या माळकरी शिष्य आणि भगवान बाबा यांच्या विषयी खूप आदरभाव कारण ही तसंच भगवान बाबा यांना आळंदी येथे सोबत घेऊन जाऊन शिक्षण देणारे बंकट स्वामीच म्हणून आपल्या स्वतच्या मुला पेक्षाही भगवान बाबा वर बनुबाई कासार पाटील यांचा जीव जास्त महणून हिमलायत जाऊ नये म्हणून मन वळवण्याचा प्रयत्न भगवान बाबा यांनी दुसर्या दिवशी फिरून येतो म्हणून खरवंडी सोडली भगवानबाबा यांचे भक्त बाजीराव पाटील यांच्या आई बानुबाईनी भिष्म प्रतिज्ञा केली भगवान बाबा परत आल्याशिवाय अन्न गृहण करणार नाही बाजीराव पाटील श्रेष्ठ मातृ भक्त आई च्या आज्ञेनुसार बाबांच्या शोधार्थ आपल्या पन्नास साठ माणसासह वेगवेगळ्या दिशेने निघाले नगरच्या रेल्वे स्थानकावर भेट झाली वादा वादी झाली पण बाबा ऐकेणात बाजीराव पाटील चाणाक्ष राजकारणी आपल्या मुनीमाला कानमंत्र देऊन मोहिमेवर पाठवले मुनीम प्रचंड हुशार त्याने मोहीम फत्ते केली मूळचे भालगाव चे नगर जिल्ह्यातील नारळाचे ठोक व्यापारी मनसुखलाल काठेड, बाळासाहेब भारदे नगरचे जिल्हाधिकारी यांना घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचला चर्चेनंतर सर्व जण मनसुखलाल काठेड यांच्या वाड्यावर आले त्या ठिकाणी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांचे अभ्यासक म्हणून ख्याती असणारे स्वामी सहजानंद भारती आले दोन महापुरुषांमध्ये चर्चा झाली बाबांनी नारायण गडावरील सर्व वृत्तांत सांगितला आणि शेवटी म्हटले मग हिमालय जाऊ नको तर कोठे जाऊ स्वामी सहजानंद भारती यांची चर्चा सफल झाली बानूबाई यांची अन्नत्यागाची भीष्मप्रतिज्ञा कामी आली बाजीराव पाटील यांना अखेर यश आलं बाबा परत खरवंडीला आले. खरवंडीला परत आल्यानंतर बाजीराव पाटलांनी दुसर्याच दिवशी बाबांचे गुरुबंधू लाला यांना पाडळी येथे घोडेस्वार पाठवून बोलून घेतले बाबा कायम आपल्या परिसरात राहावे अशी बाजीराव पाटलांची आणि त्याच दरम्यान राज्यभरातून अनेक भाविक भक्त बाबांच्या भेटीसाठी आले याच ठिकाणी धौम्यगडाच्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. खरवंडीच्या बाजूला उंच आशा डोंगरावर द्वापारयुगातील पांडवांचे गुरु धौम्य ऋषींची समाधी याच परिसराला त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचे पण चरण स्पर्श झालेला तसेच याच परिसरात शिंगोरी येथे शृंगा ऋषी, नागलवाडी येथे वाल्मीक ऋषी, पारगाव येथे (कमंडलू) परशार ऋषी, भारजवाडी येथे भारद्वाज ऋषी, काशी येथे केदार संग्राम ऋषी, गोळेगाव येथे गलंड ऋषी, मातोरी येथे मांतग ऋषी, कोनोशी येथे कण्व ऋषि यासर्व ऋषीमुनींच्या सहवासाने पावन असा भूप्रदेश आणि याच ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी सन 1951 मध्ये धौम्य ऋषीच्या पादुकांचे पूजन करून वारकरी समाजाची पताका भगवा ध्वज फडकावला आणि उजाड अशा माळरानावर बहुजन समाजाचं आध्यात्मिक ज्ञानपीठ धौम्यगड स्थापन केला पाहता पाहता पाच सात वर्षांमध्ये गडाचे बांधकाम पूर्णत्वाच्या दिशेने आले ओसाड अशा मळरानावर भव्य असा धौम्यगड उभा राहत होता, दरम्यान बाबाचे अध्यात्मिक शैक्षणिक समाजप्रबोधनाचे कार्य चालू होते बहुजन समाजाच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्यासाठी भगीरथ यांच्या सारखे अथक प्रयत्न बाबांचे अहोरात्र चालू होते. पाहता पाहता धौम्यगड बांधकाम पुर्ण झाले गडावर पंढरपूर स्थित पांडुरंगाची हुबेहूब मूर्ती जशास तशी प्राणप्रतिष्ठा करायची आणि यासाठी बाबा शेवगावचे आमदार नामदार बाळासाहेब भारदे मेहकरचे आमदार अण्णासाहेब सांगळे, गणपतराव चेपटे आणि बाजीराव पाटील मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सर्वजण पोहोचेल.
ना.बाळासाहेब भारदे म्हटले हे ह. भ. प. शांतिब्रह्म भगवान बाबा आहेत पाथर्डी तालुक्यात त्यांनी धौम्यगड बांधला आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आपण आमंत्रण स्वीकारावे ही विनंती बाळासाहेब भारदे यांचे बोला ऐकले माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तरुण व महाविद्वान व्यक्तिमत्त्व होते नम्रपणे म्हणाले माझं परम भाग्य आहे मी राज्याचा प्रतिनिधी म्हणून हजर राहिण सर्व जण परत आले निमंत्रण पत्रिका तयार झाली सगळी जय्यत तयारी सुरू झाली जिल्हाधिकारी अहमदनगर यांना मंत्रालयातून पत्र आलं नियमानुसार कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी झुबेरी साहेब धौम्यगड दौर्या यासंदर्भातील पाहणी करण्यासाठी निघाले खरवंडी येथे पोहोचले रस्ता खूप खराब होता रस्त्याची अवस्था पाहून झुबेरी साहेब चिडले बाजीराव पाटील चिंतातुर झाले अहवाल वाईट जाईल आणि दौरा रद्द होईल ही भिती बाजीराव पाटील यांना वाटु लागली सर्व जण गडावर आले जिल्हाधिकारी झुबेरी साहेब यांनी बाबांना स्मितहास्य करुन पाहीले नजरा नजर झाली प्रचंड चिडलेले साहेब काय आश्चर्य एकदम शांत झाले बाबांनी हस्त आंदोलन केले चहापाणी केले. आदरसत्कार केला चर्चा झाली प्रचंड चिडलेले जिल्हाधिकारी दौर रद्द करण्याच्या तयारीत आणि बाबांच्या भेटी नंतर चित्र बदल सर्व व्यवस्थित आहे असं म्हणुन जिल्हाधिकारी परत गेले रिपोर्ट सकारात्मक पाठवला तो भाग्यवानदिन उजाडला दि 1/5/1958 मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नगरला पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चालू झाली बैठक संपवून धौम्यगडावर जायचं तेव्हा मध्येच कुणीतरी म्हंटल की काल खूप प्रचंड पाऊस झाला आहे गडावर जाता येणार नाही इथूनच परत गेलेलं उत्तम पण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कुशाग्र बुद्धिमत्तेचे स्वकर्तुत्वावर मुख्यमंत्री झालेले आणि संत कार्यामध्ये लोक जाणीवपूर्वक विघ्न निर्माण करतात म्हणून खरी वार्ता कळल्याशिवाय परत फिरणे नाही त्यांनी काही काळ विश्राम गृहावर थांबणे पसंत केले आणि विश्रामग्रह गाठल. इकडे धौम्यगडावर पूर्ण तयारी झालेली अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त जनसमुदाय जवळपास दीड दोन लाखाच्या पुढे लोक उपस्थित राहून वाट पाहत होते मुख्यमंत्र्यांना उशीर होत आहे नेमकं कारण काय म्हणून बाजीराव पाटील नगरच्या दिशेने निघाले शेवटी नगरच्या विश्रामगृहावर येऊन पोहोचले मुख्यमंत्री गडावर का आले नाहीत म्हणून चाचपणी केली तर कारण समजलं मग बाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत चर्चा आणि सांगितले मी आत्ताच तिथून आलो आहे रस्ता खूप व्यवस्थित आहे यावर यशवंतराव यांनी सर्वांना गडाच्या दिशेने निघण्याचा सूचना केल्या अवघ्या काही वेळेत माननीय मुख्यमंत्री यांचा ताफा धौम्य गडावर पोहोचला यशवंतराव गाडीतून उतरले बाबांनी सत्कार केला दर्शन घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण आदरपुर्वक नमस्कार करण्यासाठी बाबांच्या पाया पडू लागले परंतु बाबांनी त्यांना अर्ध्यातूनच आपल्याकडे घेत मिठी मारून आलिंगन दिले दोन महामानव आज एकत्र आले होते एकाची इच्छा रयतेची भौतिक उंची वाढवण्यासाठी तर दुसरा अध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी झटणारा दोन दैदिप्यमान पुरुष एकाच वेळी एकाच स्थळी एकाच मंचावर पाहण्याचे भाग्य रयतेला लाभलेल गडाचे बांधकाम पाहून यशवंतरावांनी प्रश्न केला इंजिनियर कोण ब्ल्यू प्रिंट विचारली यावर बाजीराव पाटील म्हटले तसलं काहीच नव्हतं मा.मुख्यमंत्र्यांना काम पाहून धन्यता वाटली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आणि भगवान बाबांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थेचे उद्घाटन पूर्ण झालं भगवान बाबांनी अंगठी, फेटा, शाल, श्रीफळ देऊन यशवंतरावांचा सत्कार केला. यशवंतरावांच्या सोबत आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे मामासाहेब दांडेकर, नामदार बाळासाहेब भारदे, आमदार अण्णासाहेब सांगळे मेहकर, स्वामी सहजानंद भारती इत्यादी मंडळी उपस्थित होते प्रस्तावना गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी केली बाबा शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते तेव्हापासून मी त्यांना चांगला जाणतो अभ्यासात प्रचंड हुशार चाणाक्ष वैराग्यमूर्ती अष्ट सिद्धी व नवनिधी प्राप्त लक्ष्मी वारंवार त्यांच्या मागे धावते नशिबावर अवलंबून न राहता स्वकष्टाने नशीब घडवणारे बाबा ऐश्वर्यवान आहेत माझ्या ज्ञानाप्रमाणे संता जवळ ज्ञान असते पण ज्ञानाबरोबर लक्ष्मीचे ऐश्वर्य संत एकनाथ महाराज यांच्यानंतर भगवान बाबा यांच्या जवळच आहे भगवान बाबा राजयोगी संत आहेत. राजयोगी डोंगरावर येऊन बसला तरीही ऐश्वर्य पाठलाघ करीत मागे आलेच त्याचा आज आपण सर्वजण अनुभव करत आहोत जो वैकुंठवासी विष्णू भगवान तोच हा भगवान आहे सर्वजण त्यांची सेवा करा अशी स्तुती करून मामासाहेब दांडेकर यांनी आपले भगवान बाबा विषयी अनमोल विचार मांडले.
तद्नंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपले ऐतिहासिक मनोगत चालू केले पुर्वी अनेक राजा-महाराजांनी शस्त्र तलवार गाजवुन अनेक गड बांधले, जिंकले मला वाटलं तशाच पद्धतीचा हा पण गड असेल परंतु येथे ह.भ.प. परमपूज्य शांतिब्रह्म भगवानबाबांनी वेदशास्त्र गाजवून गड बांधला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसेच निजामाच्या ताब्यातील प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी लढा देणारे अनेक स्वातंत्र्यसैनिक देशभक्त बाबांच्या सहवासात आले होते माझ्या सातारा जिल्ह्यातील जहाल स्वातंत्र्यसेनानी प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भगवान बाबांचे दर्शन घेतले होते त्यांच्याकडून बाबांविषयी अनेक गोष्टी अनेक चमत्कार मी ऐकले होते आमचे सहकारी नामदार बाळासाहेब भारदे यांनीही बाबांच्या अनेक गोष्टी सांगितल्या मी स्वतः पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे देवावर आणि दैवावर माझा पूर्ण विश्वास आहे देशभर वारकरी सांप्रदायाची भगवी पताका फडकत आहे गड किल्ले येथूनच महाराष्ट्राचा राजकीय आणि आध्यात्मिक कारभार चालत आलेला आहे आणि तसाही पुढे चालत राहणार आहे, हा गड अध्यात्मिक क्षेत्रात आढळ असा नवा ध्रुवतारा आज निर्माण झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पासून संत एकनाथ महाराज यांच्या पर्यंत सर्व संतावर त्या त्या काळातील दुर्जनांनी अन्याय केला त्रास दिला परंतु ते शांतीब्रम्ह असल्याने असल्याने लोकांवर न रागवता त्यांच्या अपराधाला क्षमा करून उपकारच केले . जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती जन्म घेतात भगवान बाबा तर बैसोनी पाण्यावरी वाचियेली ज्ञानेश्वरी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिक निर्माण करण्यामध्ये भगवान बाबांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मराठवाडा स्थित निजाम राजवटीत निजामाच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लोकांच्या मनामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून प्रेरणादायी शक्ती निर्माण करून खूप मोठी स्वातंत्र्यसैनिकाची फळी बाबांच्या माध्यमातून उभी राहिली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पशुहत्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये जागृती अनेक लोकांमध्ये आध्यात्मिक वृत्ती वाढीस लावण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न हे सर्व कार्य भगवान बाबांचे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. भगवान बाबांनी अनेक शाळा सुरू केल्या, वस्तीग्रह चालवली, औरंगाबाद सारख्या शहरात गोरगरीब मुलांच्यासाठी उच्च शिक्षण घेता यावे म्हणून अन्नछत्र नावाने बोर्डिंग चालू केली, धौम्य गडावर त्यांनी चालू केलेल्या शाळेचे उद्घाटन संपन्न झाले असे मी घोषित करतो भगवान बाबा यांनी केलेले कार्य आणि त्यांची कीर्ती अलौकिक आहे मी पूर्वी ऐकलेली कीर्ती आणि येथे आल्यापासून पाहिलेला जनसमुदाय कार्यकर्ते आध्यात्मिक राजकीय सरकारी क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची बाबांच्या प्रति असलेली श्रद्धा ही प्रचंड आहे बाबांचे अलौकिक कार्य आणि लोकमताचा आदर म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धौम्यगडाचे नामकरण भगवानगड असे जाहीर करतो सरकारी दरबारी भगवानगड नावाची नोंद केली जाईल अशी घोषणा करतो लाखोंच्या टाळ्यांच्या गजराने अखंड आकाश दुमदूमते तसेच भगवान विद्यालयाचे ही भूमिपूजन झाल्याचे जाहीर करतो भगवान बाबा सारख्या थोर पुरुषांच्या सानिध्यात येण्याचा योग आला म्हणून पांडुरंगाचे आभार मानतो आणि हाच तो दिवस धौम्यगड ते भगवान गड.