टाकळीभान येथे शिवजयंती उत्साहात साजरी

टाकळीभान येथे शिवजयंती उत्साहात साजरी
टाकळीभान प्रतिनिधी:-टाकळीभान येथील स्टॅन्ड परिसर येथे बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवर म्हणून प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी रॉबिन बंसल, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन व आरती संपन्न झाली.
याप्रसंगी उपस्थित आयपीएस अधिकारी रॉबिन बंसल तालुक्याचे पीआय दशरथ चौधरी व नुकताच पोलीस कामगिरीच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार प्राप्त झालेले पो. नाईक अनिल शेंगाळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रॉबिन बंसल , मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी शिवजयंती कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमावेळी अवधूत रमेश कोकणे याने छत्रपती शिवरायांचा सुंदर पेहराव केला होता तर स्वरा व स्वराज विनोद रणनवरे या बाल विद्यार्थ्यांनी शिवरायांवर सुंदर मनोगत व्यक्त केले. मुस्लिम बांधव अब्दुल करीम देशमुख यांनीही शिवरायांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन, सर्वांना न्याय देण्याचे काम केल्याचे मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी मा. सभापती नानासाहेब पवार, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, उपसरपंच कान्हा खंडागळे, शिवसेनेचे दादासाहेब कोकणे, माजी सरपंच मंजाबापू थोरात,अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मयूर पटारे,मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे,प्रा.कार्लस साठे, विलास दाभाडे, टाकळीभान सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे, मा. चेअरमन राहुल पटारे, युवा नेते भाऊसाहेब पवार, मुकुंद हापसे, नारायण काळे, मधुकर कोकणे, विजय कोकणे,अण्णासाहेब दाभाडे, युवा सेनेचे अक्षय कोकणे, अनिल दाभाडे, आबासाहेब रणनवरे,ग्रामसेवक रामदास जाधव, सुधीर मगर, बंडोपंत बोडखे, मेजर दाभाडे, दत्तात्रय दाभाडे, बाळाजी कोकणे, प्रसाद कोकणे,बाबा सय्यद अनिल बोडखे,आदींसह शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ टाकळीभान यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अर्जुन राऊत यांनी केले.