मानवतेचे दर्शन घडवणारा उत्सव बैलपोळा आनंदाची पर्वणीच*

*मानवतेचे दर्शन घडवणारा उत्सव बैलपोळा आनंदाची पर्वणीच*
“चाऊर, चाऊर चांग भलं पाऊस आला घरला चला “.या घोषवाक्यांनी गाव परिसर अगदी दणाणून जातो .घोषणा देणारे लहान थोर मंडळी हे जात ,धर्म गरीब श्रीमंत हा भेदभाव विसरून अगदी एकरूप होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आंनद लहरी आणि जल्लोष करण्याची निरागस भावना या सगळ्या हलकल्लोळात बहुप्रतिक्षित असाणारा हा बैल पोळा सण अगदी उत्साहाने साजरा होतो.श्रावण महिणा लागला कि बळीराजाला चाहुल लागते .ती पोळ्याची ,आपला सखा असणारा मित्र बैलांच्या लग्नाच्या प्रसंगी कोणतीही कमी राहु नये. महणुन आख्ख कुटुंब लाहान थोर मंडळी सगळे कामाला लागतात . अगदी सुत कातणे,वेसण मोरखी ,कासरा अगदी नवीन बनवला जातो. ,गोंडे वगैरे शृंगार कसा जास्तीत जास्त करतात येईल.आणि आपला बैल कसा जास्तीत जास्त सजवुन शोभिवंत दिसेल याचा बेत किमान दोन तीन आठवडे अगोदर आखला जातो. आणि मग त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने सुरुवात होते .ती त्यासाठी शेतातील पळसाच मुळ काढुन त्याच मानासाठी सुत करणं. त्यासाठी जमिन खोदण मुळ नाही सापडलं तर दुसरीकडे शोधणं पुन्हा खोदण पण पळसाची मानाची मुळी मिळवणेच . हि सगळी मज्जा काही औरच असते.थकवा येत नाही कारण उत्साह तेवढा प्रचंड संचारलेला असतो . प्रतिक्षा तर वर्षभरापासून असते . शेतकरी राजा ज्या दिवसाची वर्षभर अगदी चातक पक्षा प्रमाणे वाट पाहत असतो .तो सन उत्सव बैलं पोळा आंनदाची पर्वणीच असतो .ज्यांच्याकडे बैल नाही ते चिखलाचा बैल करून पुजा करतो .तर लहान, लहान मुल घरोघरी चिखालाची बैल करून त्यांची सजावट करतात .हे सगळं पाहताना हि भावना आणि निखळ वात्सल्य पाहून अगदी डोळे दिपून जातील .एवढा विलक्षण आणि भावनिक हा क्षण असतो . अख्खा घरातील बायका पोर मोठी माणसं सगळीच अगदी बैलांच्या स्वगाता मध्ये लग्नासाठी कोणतीही उणिवा राहणार नाही.याची काळजी करत प्रत्येकजण आपल योगदान देत जबाबदारी पार पाडत आनंद लुटत असतो .”वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे ” मानव हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान शक्तिशाली बलाढ्य प्राणी असला .तरी मानवता जपत असताना पशु प्रति असणारी आपली कौटुंबिक स्नेहाची भावना जपताना बैलांना आपल्या परिवारातील सदस्य समजुन त्याच विधिवत लग्न लावून यथायोग्य सन्मान करतांना. तो अख्खा दिवस आनंदाची पर्वणी ठरतो .एवढा उत्साह, आनंद , हर्ष उल्हास सगळीकडे संचारलेला असतो . त्यातल्या त्यात तर खेड्यात तर विचारायची सोय नाही . स्वतःचा विसर पडेल इतकं मग्न होऊन शेतकरी राजा आपल्या कुटुंबातील सदस्यासह या मध्ये सहभागी झालेला असतो . सध्या थोडं यंत्र युगाच्या पर्वात बैल संख्या कमी झाली आहे .हे जरी वास्तव असले. तरी पण खेड्यात आजही तो आनंद कायम आहे. भारत हा शेतीप्रधान देश आणि बैल हा शेतिचा कणा आहे.बैलाशिवाय शैती हि कल्पना पण पुर्ण होत नाही.म्हणुन शेतकरी आणि बैल यांच नात हे घनिष्ठ व अविभाज्य.बैलाच महत्व हे पुरातण काळी पासून शेति ,व्यापार करण्यासाठी महत्वपूर्ण साधन म्हणून केला जात असे . आज तागायत सुद्धा परंपरेनुसार चालु आहे.देशाच्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी पिके घेतली जातात . तसंच सन उत्सव सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात . महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात साजारा केला जाणार महत्वपूर्ण सण उत्सव म्हणजे बैल पोळा . अगदी श्रावण महिन्यातील शेवटी अमावस्येच्या दिवशी शेतकरी आपलं शेत ज्या बैलाच्या साह्याने वर्षभर कसतो .तो बैल आणि शेतकरी कुटुंबाच नांत तसं हे जिवाभावाचे असते. आणि पोळ्याच्या दिवशी तर काय विचारता सोय नाही.अगदी बैलाला आपल्या कुटुंबातील सदस्य समजुन त्याच विधिवत पूजा करून लग्न लावण्याची परंपरा त्यातील आनंदी क्षण व या उत्सवात मध्ये सहभागी होणारे कुटुंबातील लहान थोर तसेच अख्या गावाला येणार जत्रेचे स्वरूप हे नेत्र दिपक असतं सगळं .आदल्या दिवशी बैलांना नदीतिरावर, विहिरी वर ,किंवा जिथं पाण्याची सोय आहे. त्या ठिकाणी अगदी साबण शाम्पू लावून अंघोळ घातली जाते.आणि त्याला नाहुन धुवून झालं कि त्याच्या शिंगाला रंग वगैरे लावला जातो . गळ्यात घुंगराच्या माळा . सजवणे दिवसभर भरपेट चारा पाणी करून संध्याकाळी खांदामळणी करून नैवेद्य खाऊ घालणे .व पोळ्याच्या दिवशी कुटुंब प्रमुख दिवसभर उपवास करून प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार दुपारी नंतर संध्याकाळच्या सुमारास गावातील सर्व बैल गावाबाहेर गावच्या वेसीत एकत्र करून मानाचा बैल पुढे मिरवून मग पोळा फुटतो . आणि आप आपल्या सोयीनुसार आपले घरी बैल वाजवत गाजवत घराच्या दिशेने आणले जातात . बैलाच विधिवत मंत्र बोलून अक्षदा टाकून आप आपल्या सोयी सुविधा नुसार लग्न लावल जात.नंतर पुरणपोळी चा नैवेद्य खाऊ घातला जातो . मग गावातील मारोती समोर बैला सह नारळ फोडुन बैल आपल्या गोठ्यात बांधून त्याला चारा टाकुन मग शेवटी दिवस भर उपवास धरणारा कुटुंब प्रमुख कुटुंबातील मंडळी एकत्र बसुन पुरणपोळी सोबत भजे, कुरवडी ,आमटी, भात या पंच पक्वान्नांवर ताव मारत उपावास सोडतात .हा दिवस खेड्यात खुप आनंदी असतो . दिवसभर गावातील गाव देवाना नारळ पळसमुळ नैवेद्य दाखवून कोणाताही देव विसरणार नाही.याची दक्षता घेतली जाते. आणि त्यासोबत गोत्रज पुर्वज यांना पण त्या निमित्ताने नारळ नैवेद्य दाखवला जातो.या दिवशी सगळीकडे अगदी नारळच नारळ असतात . आणि दिवस भर बैलांना कुठलही काम लावलं जातं नाही . अगदी मानवतेच आणि प्राणिमात्रच नातं घनिष्ठ करणारा हा सन एक पर्वणीच असतो.
सन पोळयाचा उत्सव मानवतेचा सन्मान प्राणीमात्रांचा आदर्श भुतदयेचा .
गणेश खाडे