तंटामुक्तीच्या अध्यक्ष इच्छुक महिला उमेदवाराला धमकी दिल्याने विलास दाभाडेवर गुन्हा दाखल….

तंटामुक्तीच्या अध्यक्ष इच्छुक महिला उमेदवाराला धमकी दिल्याने विलास दाभाडेवर गुन्हा दाखल….
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील तंटामुक्तीच्या पदावरूनच तंटा निर्माण झाला असून तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून वाद होऊन श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये फिर्यादी सौ. सुप्रिया प्रकाश धुमाळ यांनी म्हटले आहे की 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० दरम्यान बस स्टॅन्ड जवळ उभे असताना आरोपी विलास भाऊसाहेब दाभाडे टाकळीभान ता. श्रीरामपूर यांनी आमच्याजवळ येऊन मला व माझ्या सहकाऱ्यांना दम दिला तुम्ही आमच्या विरुद्ध तंटामुक्ती अध्यक्षपदा साठी अर्ज भरायचा नाही, उभे राहायचे नाही, जर कोणी उभे केले तर आम्ही एक एकाला मारून टाकू, हातपाय काढून ठेवू, बऱ्या भल्याने गावात राहायचे असेल तर नीट रहा, नाहीतर एकेकाचा बेत पाहतो असे म्हणत धमकी दिली आहे. त्यानुसार विलास भाऊसाहेब दाभाडे यावर भा.द.वि. कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पी आय खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे कॉ ,पवार हे करत आहे.