सेंद्रिय, वैदीक शेतीचे जनक राम मुखेकर यांना कृषि उद्योजक २०२३ पुरस्कार प्रदान

सेंद्रिय, वैदीक शेतीचे जनक राम मुखेकर यांना कृषि उद्योजक २०२३ पुरस्कार प्रदान
बेलापुर ( प्रतिनिधी )-कृषि प्रदर्शन अँग्रो वर्ल्ड २०२३ चा कृषि उद्योजक पुरस्कार सेंद्रिय व वैदिक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना प्रदान करण्यात आला दिनाक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानात कृषि प्रदर्शन भरविण्यात आले होते या वेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेंद्रिय व वैदीक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते अँग्रो वर्ल्ड कृषि उद्योजक २०२३ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे रासायनिक खते वापरुन मृत झालेल्या जमिनीला , शेतीला संजिवनी देण्याचे कार्य राम मुखेकर यांनी साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून सुरु केले अथक परिश्रमातून व संशोधनातून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली पूर्व परंपरागत शेती सोडुन जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खते वापरुन शेती निर्जीव झाली त्या शेतीला कशाची गरज आहे यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना वैदीक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करुन दिले रासायनिक शेती बंद करुन सेंद्रिय वैदीक शेती पिकवा आपले अन पुढील पिढीचे रोगापासून, आजारापसून संरक्षण करा रोगावर खर्च करण्याआगोदर पिकाच्या पोषणावर भर द्या पिकाला असलेल्या कमजोरीमुळे रोग येतो पिकाला पोषण भरपुर ताकद दिली तर रोगच येणार नाही अशी त्यांची शेतकऱ्यांना शिकवण आहे शेतकऱ्यांच्या बांधावार जावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची राम मुखेकर यांची पद्धत आहे आज महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ईतर राज्यातील शेतकरीही आता वैदीक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत राम मुखेकर यांच्या या कार्याची दखल घेवुन अँग्रो वर्ल्ड संस्थेच्या वतीने त्यांना या वर्षीचा कृषि उद्योजक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे .