साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित

साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित
कारेगाव या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. गेल्या दहा वर्षापासून कारेगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण रक्तपेढी या रक्तदानासाठी येत असते. या रक्तदानासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने भाग घेतात.यावर्षी १२ जानेवारी रोजी सकाळी ठिक ०९ वाजता हनुमान मंदिर प्राणांगणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामस्थांना नम्र विनंती करण्यात येत आहे.
१८ते ६० वयोगटातील कोणीही निरोगी स्त्री आणि पुरुष रक्तदान तीन महिन्यानंतर म्हणजे वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकते.
दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी समाज सेवेचे भान ठेवून… चला करूया रक्तदान… आणि जीवदान देऊयात…!
सर्वांनी रक्तदान करा व इतरांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करा.