क्रिडा व मनोरंजन

जातेगावात पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला आले अन् कुस्ती गाजवून गेले

जातेगावात पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला आले अन् कुस्ती गाजवून गेले

 

सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यात्रा आणि उरूस भरवले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने गावात कुस्त्यांचे आखाडे देखील भरत आहे. तर राज्यात काही गावातील कुस्त्यांची एक आगळीवेगळी ओळख असल्याने या आखाड्यांची आणि कुस्त्यांची नेहमीच चर्चा होत असते. गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र जातेगाव येथील यात्रोत्सवात भरवण्यात आलेल्या कुस्त्यांची एका वेगळ्याच कारणाने चर्चा होत आहे. कारण कुस्त्याच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने बंदोबस्तसाठी आलेल्या एका जमादाराने लातूरच्या मल्लाला अस्मान दाखवून विजेतेपद पटकावले. हरिभाऊ बांगर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बांगर हे तलवाडा पोलीस ठाण्यात ठाण्याचे अंमलदार असून, जातेगावचे बीट जमादार आहे. 

धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार मिशा अन् अंगात खाकी यामुळे हरिभाऊ बांगर यांचे कुस्ती क्षेत्रासह पोलिस दलातही नाव आहे. मूळचे पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावचे बांगर हे सध्या तलवाडा ठाण्यात कार्यरत आहेत. तर जातेगावचे बीट जमादार असल्याने ते गावातील यात्रोत्सवात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र याचवेळी कुस्ती बंदोबस्तावरील बांगर यांनाही डाव खेळण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय वर्दी काढून ते मैदानात उतरले. त्यांचा सामना लातूरच्या रफिक पठाणशी झाला. जातेगाव येथे झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशातील पहेलवानांनी हजेरी लावली होती. हलगीच्या तालावर रंगलेल्या सामन्यात हरिभाऊ बांगर यांनी रफिक पठाणला हरवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर त्यांचा सत्कार करून बक्षीस प्रदान करण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वागत केले.दरम्यान या कुस्तीची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर बांगर यांचे कौतुक देखील होत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे