अपघात
आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले

आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले
रास्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
बच्चू कडू यांनी ट्विट करत लिहिले की, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये”.
मात्र, आज सकाळी प्राथमिक उपचार झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी अमरावतीवरून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलला रवाना केले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत सोबत पत्नी नयना कडू देखील होत्या