*पोलिसांची दमछाक,बेशिस्त वाहन चालकामुळे आळंदीत चक्काजाम*

*पोलिसांची दमछाक,बेशिस्त वाहन चालकामुळे आळंदीत चक्काजाम*
लग्नाची मोठी तीथ, तसेच रविवार यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणात आज गर्दी दिसून आली आळंदीत वाहनांच्या बाबतीमध्ये नेहमीच बेशिस्तपणा दिसून येतो परंतु आज आळंदीत लग्नाची मोठी तारीख असल्याने बाहेर गावावरून येणारे बऱ्याच गाड्या तसेच बेशिस्त वाहनचालकामुळे आळंदीत चक्काजाम पाहायला मिळाले त्याचबरोबर अवजड वाहनांना दिवसा प्रवासासाठी बंदी असतानाही अवजड वाहने आळंदीत मुख्य रस्त्यांवर दिसत होते त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आळंदी वाहतूक विभागाचे एपीआय शहाजी पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
परंतु वाहन चालक सरळ रेषेत गाडी न चालवता पुढे जाण्याचा प्रयत्न वारंवार करत होते त्यामुळे अक्षरशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे इतर वाहतूक पोलीस कर्मचारी यांची दमछाड झाली व स्वतः वाहन चालकाने शिस्तीचे पालन करून सूचनांचे पालन केल्यास वाहतूक कोंडी टाळणे शक्य आहे परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या कर्मचाऱ्यासमोर वारंवार वाहन चालकांना विनंती करताना दिसले वरिष्ठ अधिकारी विनंती करूनही वाहन चालक मात्र सरळ रेषेत गाड्या नेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहायला मिळेल त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत होती.
स्वतः पायी चालत जात लोकांना विनंती करू नये वाहन चालक मात्र जागा मिळेल तशा गाड्या पुढे नेत होते एका रेषेमध्ये सरळ रेषेत गाडी घ्या या विनंतीला जुमानता आळंदी चक्काजामची परिस्थिती पाहायला मिळाली लग्न कार्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने आळंदीत येतात त्याचबरोबर आळंदी वाहतूक व्यवस्थेच्या बाबत योग्य सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून आले येणाऱ्या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात लग्न स्थित आहेत आणि आळंदीत लग्न मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे वाहतूक कोंडीवर योग्य तो उपाय काढणे गरजेचे आहे.
सकाळी अकरा वाजल्यापासून वाहनांची आळंदीत गर्दी तसेच माणसांची गर्दी दिसून येत होती सुमारे पाच तास उलटूनही वाहतूक कोंडी सुटेल याची शक्यता मात्र दिसून येत नाही