आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

अनुज राजळे याची देशपातळीवर उत्कृष्ट तायकांडो खेळाडू म्हणून निवड…

 अनुज राजळे याची देशपातळीवर उत्कृष्ट तायकांडो खेळाडू म्हणून निवड…

 

 

टाकळीभान येथील अनुज महेश राजळे याची उत्कृष्ट तायकांडो खेळाडू म्हणून देश पातळीवर निवड चाचणीत नुकतीच निवड झाली आहे.

 

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय लष्कर यांच्यातील संयुक्त उपक्रमाने उत्कृष्ट तायकांडो खेळाडू निवड करण्यासाठी आयोजित ऑल इंडिया इंडक्शन रैली 12 ते 14 जुलै रोजी आर्टली सेंटर नाशिकला उत्कृष्ट तायकांडो खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती.

 

त्यामधे भारत देशामधून 8 ते 14 वयो गटातील सुमारे 250-300 तायकांडो खेळाडूंनी भाग घेतला होता यापैकी 23 खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये टाकळीभानचे सुपुत्र अनुज महेश राजळे( वय 12 वर्ष) यांची निवड झाली आहे. अनुज हा गेल्या 4 वर्षापासुन् सिलवासा येथे तायकांडो खेळाचेचे ट्रेनिंग घेत आहेत. 5 जानेवारी पासुन् ते नाशिक आर्टिलरी सेंटर येथे जॉईन होणार आहे.

 

अंगणवाडीच्या सुपरवायझर सौ.मंगलताई राजळे यांचे ते नातू व क्रिकेटर महेश् राजळे यांचे सुपुत्र असून कबड्डी पट्टू दीपक राजळे यांचे ते पुतणे आहेत.त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल टाकळीभान गावातील मान्यवर, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,व मित्र परिवाराने खेळाडू चि. अनुज याचे अभिनंदन व कौतुक केले आहे

 

2.7/5 - (3 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे