टाकळीभानचे भूमिपुत्र ज्ञानदेव पवार यांची बायोमेडिकल यूनिवर्सिटी ऑफ रोम(इटली) रिसर्च असोसिएट म्हणून निवड…

टाकळीभानचे भूमिपुत्र ज्ञानदेव पवार यांची बायोमेडिकल यूनिवर्सिटी ऑफ रोम(इटली) रिसर्च असोसिएट म्हणून निवड…(ग्रामस्थांच्या वतीने सत्कार)
टाकळीभान:टाकळीभानचे भूमिपुत्र श्री ज्ञानदेव कारभारी पवार यांची बायोमेडिकल यूनिवर्सिटी ऑफ रोम(इटली) येथे रिसर्च असोसिएट म्हणून निवड झालेली आहे. यापूर्वी ते शेनझेन युनिव्हर्सिटी चायना येथे तीन वर्ष गॅस सेंसरवर त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर पीएचडीनंतर ते आईसर मोहाली आणि सी.एस. आय. आर. चंदीगड येथे ऑप्टिकल फायबर सेन्सर्स वर त्यांनी काम केलेले आहे.
त्यांनी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया व न्यू ओरिलीन्स अमेरिका येथे वेगळ्या कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध सादर केलेले आहे. ज्ञानदेव पवार एक शेतकरी कुटुंबातून परदेशातील या उच्च पदावर आपल्या मेहनतीने, चिकाटीने पोहोचले आहेत, त्यासाठी त्यांच्या आई-वडील,पत्नी, भाऊ यांची मोलाची साथ आहे. ज्ञानदेव पवार यांची माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान, बी.एस.सी. पदवी चे शिक्षण बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, IIT चे शिक्षण खरगपूर, M.Tec. पश्चिम बंगाल,DIAT DRDO पुणे इथून ऑप्टिकल फायबर सेन्सर्स वर पीएचडी पूर्ण केलेली आहे. या उच्चशिक्षणानंतर त्यांनी परदेशात संधी मिळवल्या आहेत. त्यांची या उच्च पदावर निवड झाल्याबद्दल माजी सभापती नानासाहेब पवार मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने गावाचे भूषण असणारे ज्ञानदेव पवार व त्याला घडविणारे व त्याचे स्वप्न पूर्ण करणारे वडील कारभारी पवार यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला.
व त्याच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक करण्यात आले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, उपसरपंच कान्हा खंडागळे, सुधीर मगर, बाबासाहेब पवार, सुभाष ब्राह्मणे,राजेंद्र देवळालकर, शंकरराव शिंदे, बाळासाहेब शेळके, बबलू बनकर, यावेळी उपस्थित होते.