संपादकीय
शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करावी. पो. नि. मच्छिंद्र खाडे यांचे आवाहन.

शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करावी. पो. नि. मच्छिंद्र खाडे यांचे आवाहन.
कोरोनाचा संसर्ग सुरूच असून कोरोना पोझिटिव्ह रूग्ण संख्या वाढती आहे त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठी साजरी न करता साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती असल्याने टाकळीभान पोलिस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खाडे बोलत होते.
यावेळी बोलतांना उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, शिवजयंती निमित्त फक्त शिवपूजन केले जाणार असून मिरवणूक काढण्यात येणार नाही व जयंती साध्या पद्धतीनेच साजरी करण्यात येईल. मार्च महिन्यात तिथीप्रमाणे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठी साजरी करण्यात येणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, नारायण काळे, सुप्रिया धुमाळ, अक्षय कोकणे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकाळ, बाबासाहेब रणनवरे, मोहन रणवरे महेंद्र संत, सागर पठाडे शिवा साठे बाळू गांगुर्डे सतीश रणनवरे, सुंदर रणनवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद गायमुखे, पोलिस नाईक अनिल शेंगाळे, साजीद शेख, पोलिस मित्र बाबा सय्यद आदी उपस्थित होते.
येथील पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी मार्गदर्शन केले. यावळी उपस्थित ग्रामस्थ