बालविवाहातून दवाखान्यात बालक जन्माला आल्याच्या खबरी वरून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तथा बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

बालविवाहातून दवाखान्यात बालक जन्माला आल्याच्या खबरी वरून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तथा बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
*आठवड्यात राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये दुसरा गुन्हा दाखल*
राहुरी पोलीस ठाणे गु.र.क्र.947/24 us 65(1) भारतीय न्याय संहिता rw us 4,8,10 पोक्सो कायदा rw 9,10,11 बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये दिनांक 23. 8. 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, मुलगी नामे अ ब क ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचे आई वडील यांनी तिचे लग्न मुख्य आरोपी सोबत लावून दिले. त्यातून आरोपी याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले व त्यातून सदर अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली व तिने एका बाळाला जन्म दिला. असे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 5 आरोपी (पिडीतेचे आई-वडील व आरोपीची आई वडील तसेच विवाह करणारा नवरा मुलगा) यांचे विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी याचा राहुरी पोलिसांकडून शोध चालू होता त्यास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार राजेंद्र नागरगोजे, रवींद्र कांबळे यांनी आरोपीस पकडून सदर गुन्ह्यात दिनांक 26/08/2024 रोजी अटक करण्यात आली असून आरोपी हा दिनांक 29/8/ 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.
सदर गुन्ह्या चा तपास पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस हवालदार नागरगोजे, रवींद्र कांबळे हे करत आहे.
*तरी सर्व नागरिकांना व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपले मुलं मुली हे कोणासोबत राहतात, खेळतात, फिरतात यावर जागरूकतेने लक्ष ठेवले पाहिजे. ते कोणाच्या आमिषाला, भूलथापांना बळी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना शाळेत व घरी गुड टच, बॅड टच याचे शिक्षण मार्गदर्शन केले पाहिजे.*
*तसेच राहुरी गटविकास अधिकारी यांना व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांना आव्हान करण्यात येते की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये ग्रामसेवक हा सदर गावचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्त असतो. त्यांनी आपल्या गावात जनजागृती करून बालविवाह होणार नाहीत व त्यातून कुठलीही अल्पवयीन मुलगी गरोदर राहणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या स्तरावर जनजागृती करावी. असे आपल्याला आढळून आल्यास आपण स्वतः योग्य कारवाई करून राहुरी पोलीस ठाणे येथे घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद द्यावी*