नोकरी

अहमदनगर जिल्हा अंतर्गत पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांच्या झाल्या बदल्या तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश.

अहमदनगर जिल्हा अंतर्गत पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांच्या झाल्या बदल्या तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश.

 

 

 

टाकळीभान प्रतिनिधी- नगर जिल्ह्याला नव्याने बदलून आलेले कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी दोन-तीन महिने संपूर्ण जिल्ह्याचा बारकाईने आढावा घेऊन अभ्यास केला व काल नगर जिल्ह्यातील जवळजवळ अहमदनगर जिल्हा अंतर्गत सर्वच पोलीस निरीक्षकांच्या व काही सहय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच बदल्या केल्या त्यामुळे ‘भाकर फिरविली’ अशी ही एसपी राकेश ओला यांची भूमिका ठरली आहे. सर्व बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांना तातडीने आपापल्या ठिकाणी हजर होऊन काम सुरू करण्याचे आदेश एसपी राकेश ओला यांनी बजावले आहेत. प्रामुख्याने बदली झालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक व त्यापुढे त्यांना मिळालेली नेमणूक ठिकाण पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव-कोतवाली पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे- तोफखाना, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी- सुपा, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड- पारनेर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले- श्रीगोंदा, पोलीस निरीक्षक विजय करे- कर्जत, पोलीस निरीक्षक महेश पाटील- जामखेड, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे- बेलवंडी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे- पाथर्डी, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे- नेवासा, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी- श्रीरामपूर शहर नियमीत, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी- श्रीरामपूर तालुका, पोलीस निरीक्षण डांगे- राहुरी पोलीस स्टेशन नियमित, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ- शिर्डी, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील- वाहतूक शाखा शिर्डी, पोलीस निरीक्षक रामचंद्र ढिकले- कोपरगाव शहर, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले- कोपरगाव तालुका, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे- संगमनेर शहर, पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे- संगमनेर तालुका, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर- घारगाव पोलीस स्टेशन, पोनि सुभाष भोये- अकोले, पोनि संतोष भंडारे- आश्वी, पोनि मोरेश्वर बेदाम- शहर वाहतूक शाखा, पोनि चंद्रकांत निरावडे- जिल्हा वाहतूक शाखा, पोनि दिनेश आहेर- सायबर पोलीस ठाणे, पोनि मच्छिंद्र खाडे- मानव संसाधन नगर, पोनि सुहास चव्हाण- आर्थिक गुन्हे शाखा, पोनि अरुण आव्हाड- आर्थिक गुन्हे शाखा, पोनि घनश्याम बळप- वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय, पोनि संपत शिंदे- जीविशा शाखा नगर, पोनि राजेंद्र भोसले- जीवी शाखा नगर, पोनि इंगळे साई- मंदिर सुरक्षा, पोनि नितीन कुमार गोकावे- नगर, सपोनी राजेंद्र सानप- एमआयडीसी पोलीस स्टेशन, सपोनी शिरीष कुमार देशमुख- नगर तालुका, सपोनि मुंडे- भिंगार कॅम्प, सोपोनी युवराज आठरे- लोणी पोलीस स्टेशन, सपोनी महेश जानकर- खर्डा पोलीस स्टेशन, सपोनी कैलास वाघ- तोफखाना, सपोनी समाधान पाटील- शिर्डी पोलीस स्टेशन, सपनि गणेश इंगळे- राजुर, सपोनी माणिक चौधरी- सोनई, सपोनी प्रकाश पाटील- अर्ज शाखा, सपोनी ज्ञानेश्वर थोरात नेवासा, सपोनी गणेश वारुळे- स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि राजेंद्र पवार- संगमनेर शहर, सपोनि राजू लोखंडे- राहुरी, सपोनि अरुण भिसे- वाहतूक शाखा शिर्डी आशांची बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांनी आपापल्या ठिकाणी तातडीने हजर होण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस पी राकेश ओला यांनी या बदल्याचे आदेश नुकतेच जारी केले. एसपी राकेश ओला यांना काम करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बद्दल नेहमी आस्था असून चमकोगिरी व पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या विषयी त्यांना फारसा रस नाही त्यामुळे आता जे पोलीस निरीक्षक गुन्ह्यांचे तपास वेगाने करतील अशांना निश्चितच एस पी राकेश ओला यांच्याकडून कौतुकाची थाप मिळल्याशिवाय राहणार नाही. नवे एसपी म्हणजेच नवा गडी नवा राज जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिल्ह्यात सध्या वाळू तस्करी व गोमास व अवैध धंद्यांच्या मुस्क्या आवळलेल्या असून आता ‘भाकर’ तरफिरविल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे कामाची कसब लागणार आहे. या बदलांचे पोलीस अधिकाऱ्यांमधून स्वागत करण्यात आले हे विशेष होय.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे