महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन…

महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन…
बीड जिल्हा रुग्णालयास महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांनी भेट देऊन डॉक्टर सुरेश साबळे यांच्या उत्कृष्ट आरोग्य सेवेच्या कार्याचे कौतुक करून केले समाधान व्यक्त
आज रोजी म्हणजेच दिनांक 1.3. 20 23 रोजी म्हणजेच बुधवार रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांनी भेट देऊन बीड जिल्हा रुग्णालयाची केली पाहणी व प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन त्यांनी तेथे असलेल्या रुग्णांची तब्येतीची कसून चौकशी केली व वार्ड क्रमांक सहा मध्ये महिला सखी मंच या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली आणि तेथे असलेल्या पीडित महिला त्यांच्या तब्येतीची कसून चौकशी केली आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीचे निवारण मी येत्या काही दिवसात लवकरात लवकर करेल आणि या पीडित महिलांना लवकरच न्याय मिळवून देईल असे आश्वासन देखील राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांनी दिले या नंतर पत्रकारांनी रूपालीताई चाकणकर यांना बीड जिल्हा दौरा व बीड जिल्हा रुग्णालयातील काही महत्त्वाच्या विषयावर प्रश्न विचारले असता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी सांगितले की डॉक्टर सुरेश साबळे यांचे आरोग्य सेवेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे मी प्रत्येक ठिकाणी वार्डमध्ये जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी मला शांतता दिसून आली आणि सर्व रुग्णांची देखील मी कसुन चौकशी केली असता रुग्णांमधून देखील डॉक्टर साबळे यांच्या आरोग्य सेवेच्या बाबतीत खूप चांगले कार्य असल्याचेही काही रुग्णांनी मला सांगितले म्हणून त्यांच्या सर्व बीड जिल्हा जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर स्टाफ नर्स परिचारिका यांचे आरोग्य शुभेच्छा बाबतीत असलेल्या उत्कृष्ट कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे ही मोजक्या शब्दात सौ. रूपालीताई चाकणकर महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश राज्य महिला आयोग अध्यक्षा यांनी सांगितले या वेळी बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ नर्स व परिचारिका तसेच सर्व कर्मचारी अधिकारी हे डॉक्टर सुरेश साबळे यांच्या समवेत उपस्थित होते म्हणून बीड जिल्हा रुग्णाच्या आरोग्य सेवेच्या कार्याच्या बाबतीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी आनंद व्यक्त केला असल्याचेही बीड जिल्हा रुग्णालय येथे आज भेटी दरम्यान आसे सर्व नागरिकांमधून तसेच रुग्णांमधून बोलले जात आहे सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या समवेत उपस्थित असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या एडवोकेट संगीता ताई चव्हाण तसेच सौ. प्रज्ञाताई खोसरे सह या वेळी येथे उपस्थित असलेले पत्रकार संजय देवा कुलकर्णी तसेच संपादक बाळासाहेब उर्फ रोहित धुरंदरे सह सर्व मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते ..