संजीवन समाधी सोहळा निमित्त आळंदीत अतिक्रमणावर आळंदी पोलीस आळंदी नगरपरिषद यांचेकडून धडक कारवाई दिंड्या येण्यास प्रारंभ राहू त्यांचीही लगबग सुरू*

*संजीवन समाधी सोहळा निमित्त आळंदीत अतिक्रमणावर आळंदी पोलीस आळंदी नगरपरिषद यांचेकडून धडक कारवाई दिंड्या येण्यास प्रारंभ राहू त्यांचीही लगबग सुरू*
संत ज्ञानेश्वर महाराज 726 वा समाधी सोहळा आळंदीत उस्ताहात पार पडत आहे,आळंदी देवाची येथील कार्तिकी वारी 2022 ला दि. 17 रोजी सुरुवात होत आहे, जागतिक महामारीच्या नंतर भरणारी मोठी यात्रा म्हणून याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे, माहितीपूर्ण अशा अंदाजानुसार यंदाची वारी 10 ते 12 लाख वारकरी भाविकांनी भरणार अशी शक्यता वर्तवली जात आहे, आळंदी पोलिसांनी ग्रामस्थ आणि भाविकांसाठी पासची व्यवस्था केलेली आहे आषाढी वारीच्या वेळी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या समन्वय राखून सुद्धा प्रवेश न दिल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली होती, मात्र आळंदी पोलिसांनी पास देण्यासाठी अर्ज करण्याची ग्रामस्थांनी भाविकांना आवाहन केलेले आहे त्यानुसार आळंदी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे जागतिक महामारीनंतर भरणारी मोठी यात्रा म्हणून आळंदी यात्रा कडे पाहिले जाते,त्या अनुषंगाने राहूट्या, जागोजागी वारकऱ्यांचे फड, उभे राहिलेले आहेत , वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्यांच्या गाड्या आळंदीत दाखल होत आहेत, आणि गर्दीवर नियंत्रण करत सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि आळंदी नगरपरिषद यांच्यावर आहेत, त्याचबरोबर आरोग्य सेवांच्या बाबतीत येणारा ताण याचाही विचार प्रशासकीय यंत्रणेतून घेतला जात आहे,दरम्यान आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडून आळंदीतील अतिक्रमणावर पोलीस यंत्रणेच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे, अतिक्रमणात जप्त केलेले साहित्य आळंदी नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये ठेवण्यात येत आहे, या अतिक्रमण कारवाई मध्ये जप्त केलेले साहित्य दंड भरून घेऊन परत देणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले, त्याचबरोबर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 14 देहू फाटा येथील अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली, आळंदी वाहतूक विभागाचे एपीआय शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदीतील सर्व रस्ते फुटपाथ पूर्णतः मोकळे करून यात्रेकरू आणि भाविकांना होणाऱ्या अडचणी बाबत दक्षता घेतली जाणार आहे, भविष्यात पुन्हा कोणी अतिक्रमण करू नये अथवा त्यावर यात्रेनंतर ही कारवाई केली जाईल अशी सूचना पोलीस प्रशासन आणि आळंदी नगरपरिषद यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी यात्रा ही आळंदी यात्रा म्हणून याकडे पाहिले जाते, मोठ्या संख्येने भाविक येथे आल्यामुळे त्यांना सुविधा पुरवणे याबाबत आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस, आरोग्य विभाग, यांची कसोटी लागणार आहे, याच अनुषंगाने पीएमपीएल यांच्या मार्फत जादा बसेस आळंदी यात्रेसाठी गुरुवारपासून सोडण्यात येणार आहेत, चाकण चौक भरावा रस्ता मादरचोत वडगाव रस्ता प्रदक्षिणामार्ग चावडी रोड देहू फाटा या व इतर ठिकाणच्या सर्व बाजूला वेळोवेळी कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच आळंदी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि पोलीस प्रचाराचा प्रशासनाच्या सहाय्याने अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात येणार आहे तसेच खेळणी वाले पथरी वाले प्रसाद वाले इतर व्यवसाय यांना फुटपाथ आणि रस्त्यावर बसल्यास बंदी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे दुकानदार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई ही प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आहे,.दिंड्या वारकरी आळंदीत येण्यास सुरुवात