चंपाषष्ठी निमित्ताने टाकळीभान येथे होमहवन. जागरण गोंधळ व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता.
चंपाषष्ठी निमित्ताने टाकळीभान येथे होमहवन. जागरण गोंधळ व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे चंपाषष्ठी निमित्ताने आज मंगळवार दि.२९ रोजी येथील जुने ग्रामपंचायत शेजारी असणार्या खंडोबा महाराज मंदीरात होमहवन करण्यात आले.
सकाळी ९ ते १२ या वेळेत पार पडलेली होमहवन पुजा मयुर व सौ.अंकीता शेळके, संकेत व सौ.स्वाती कोबरणे, केतन व सौ.गीता कलंके, गौरव व सौ.प्रणाली मैड, अमित व सौ.कोमल परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली. पौराहीत्य सुदाम शास्री देवळालकर व ओमकार कृष्णकांत जोशी, शुभम सुनिल नांदुरकर गुरूजी यांनी केले. सायंकाळी ६ वा.बंडू वाघे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होवून वांग्याचे भरीत, भाकरी, आमटी, भात, लापशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
चंपाषष्ठीचा कार्यक्रम संपन्न करणेकामी उपसरपंच कान्हा खंडागळे, गणेश शेळके, गणेश कोकणे, अक्षय कोकणे, विलास सपकळ, विठ्ठल जाधव, रवि बोडखे, बाबासाहेब गायकवाड, केतन शिंदे, गौरव चितळे, मनोज पवार आदींनी परिश्रम घेतले.