कृषीवार्तामहाराष्ट्र

सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत कारण

सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत कारण

 

*4,5,6 जानेवारी 2023 ला* 

 

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी हा संप आहे. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे. उदा. BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुली मुळे नाराज असतील पण ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारा सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे.

 

 पुन्हा एकदा क्षमस्व 🙏🙏

 

तर्फे *महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समिती*

सर्व आप्त, मित्र आणि परिजनांना नम्र आवाहन,

 

● आज रात्री १२:०० वाजलेपासून म्हणजे ०४.०१.२०२३ च्या ००:०० पासून आम्ही निर्मिती, पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगारवर्ग 72 तासांच्या संपावर जात आहोत.

 

● मुंबई आणि पुणे शहर येथे अदानी इलेक्ट्रिक कंपनी ने समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला असून इतरही नफ्याची शहरे ताब्यात घ्यायचा सदर कंपन्यांचा प्रयत्न आहे.

 

● सद्यस्थितीत Cross Subsidy च्या समीकरणातून संपूर्ण महाराष्ट्रात एकच वीजदर लागू केला जातो, ज्यामुळे विजेचे दर नियंत्रणात राहतात. 

 

● असे खाजगीकरण झाल्यास cross subsidy च्या समीकरणावर थेट परिणाम होऊन वीजदर नियंत्रणाबाहेर जातील.

 

● ह्या गोष्टीला विरोध म्हणूनच आम्ही प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच संपाची नोटीस दिली होती.

 

● पण प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

 

● ह्या संपाचा परिणाम सर्वांवरच होऊ घालणार आहे, वीजपुरवठा आहे असा ठेऊन आम्ही संप सुरू करीत आहोत, पण वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कधी पूर्ववत होईल हे सांगता येणार नाही.

 

● आपणास सर्व गोष्टींची कल्पना असावी, आणि चुकीच्या बातम्या येऊन गैरसमज होऊ नयेत म्हणून ह्या आवाहनाचा प्रपंच.

 

● मोबाईल आणि तत्सम गोष्टी चार्ज करून ठेवावेत, सर्व शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करावी.

 

● होणाऱ्या तसदीसाठी दिलगीर आहोत, पण आज नाही तर कधीच नाही.

 

● आपल्या सर्वांच्या हक्कासाठी पुढील चांगल्या भवितव्यासाठी संपास पाठिंबा देणे बाबत व सहभागी होण्याबाबत आवाहन करत आहे.

 

– आंदोलक वीज कर्मचारी.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे