
ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांची ग्रामसेवक पतसंस्थेत संचालकपदी निवडून आल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने वतीने सत्कार…
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावचे सुपुत्र व सध्या बेलापूर येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हे नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सह. पतसंस्थेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी संचालकपदी निवडून आल्याबद्दल टाकळीभान भारतीय जनता पार्टी व माजी सभापती नानासाहेब पवार मित्र मंडळ, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा सभापती नानासाहेब पवार , लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भागवत रणनवरे, एकनाथ पटारे , मुकुंद हापसे, अविनाश लोखंडे, भाऊसाहेब पवार ,अनिल दाभाडे,विकास मगर, चंद्रकांत थोरात रमेश लोखंडे, ,आप्पासाहेब रणनवरे ,रमेश पटारे,केशव रणनवरे आदी उपस्थित होते. सर्वांनी ग्रामसेवक तगरे यांचे यशाबद्दल अभिनंदन केले.
विजयी उमेदवार तगरे यांनी ज्या टाकळीभान ग्रामपंचायत मध्ये सुरुवातीला कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीचे ग्रामविकासअधिकारी यांचा त्यांनी पराभव केला हा योगायोग या निवडणुकीच्या निमित्ताने घडला…