डॉक्टर नानासाहेब भोसले सीसीएमपी परिक्षेत उत्तीर्ण

डॉक्टर नानासाहेब भोसले सीसीएमपी परिक्षेत उत्तीर्ण
श्रीरामपूर: राज्य सरकारच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सीसीएमपी परिक्षेत डॉ.नानासाहेब भोसले अ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. डॉ.भोसले मागील २२ वर्षांपासून कारेगाव व परिसरात वैद्यकीय सेवा देतात.
डॉ.भोसले एक हूशार ,तज्ञ असून ते अल्पशा दरात रूग्णांना सेवा देतात. तसेच कोरोना नामक महामारी मध्येही डाॅ भोसले यांनी रूग्णांना अल्पशा दरात सर्वोत्तम सेवा दिली आहे . श्रीरामपूर तालुक्यातून डॉ भोसले यांना सीसीएमपी परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व अभिनंदनही होत आहे.
श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे खजिनदार विद्यमान जालिंदर भवार , प्रशांत उचित, मनोहर जाधव, संतोष खरात, कविराज वाघ, राजेश पाटणी , सतिश शेळके ,प्रदिप डावखर ,राकेश सहानी आदींनी त्यांचे अभिनंदन केले व शालपुष्प देऊन सत्कार करण्यात आला आहे.