ए एस आय रावसाहेब कुसमाडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.

ए एस आय रावसाहेब कुसमाडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.
ए एसआय रावसाहेब कुसमाडे प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. या सेवानिवत्ती निमित्ताने पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर यांनी नूकताच त्यांचा सन्मान केला आहे.
पोलीस दलात ए एस आय रावसाहेब कुसमाडे यांनी उत्कृष्ठ अशी सेवा दिली. आपल्या कारकिर्दीत अकोले, अ.नगर शहर, संगमनेर, श्रीरामपूर, टाकळीभान, पारनेर, पाथर्डी तालूका, पोलीस मुख्यालय, आर्थिक गुन्हे शाखा आदी ठिकाणी कर्तव्य बजावले. आपल्या संपूर्ण पोलीस दलातील कारकिर्दीत त्यांना १५० रिवार्ड मिळाले आहे. विशेष करून आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वरिष्टांकडून त्यांचे कौतूक केले जात होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा राहीला. काम करत असताने ओळखीतील किंवा अनोळखी व्यक्ती असो मात्र सर्वांना समान वागणूक दिली असल्याचे कुसमाडे यांनी सांगीतले. एकूण ३९ वर्ष २ महिने २९ दिवस त्यांनी पोलीस दलात सेवा केली. वयोमानानूसार दि.३१/५/२०२२ रोजी ते पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा साजरा करून त्यांना निरो दिला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अग्रवाल, होम डि.वाय.एस.पी पाटील, पो.नि.डांगे, गुन्हा अन्वेषणचे पो.नि.अरूण आव्हाड, ए.एस.आय. अभिजीत जाधव, महिला ए.एस.आय.तेजस्विनी पाचपुते यांचेसह पोलीस दलातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.