शालेय जीवनातील खेळामुळे चांगल्या आरोग्याची पायाभरणी… प्रा. देशमुख

शालेय जीवनातील खेळामुळे चांगल्या आरोग्याची पायाभरणी… प्रा. देशमुख
टाकळीभान प्रतिनीधी: शालेय जीवनातील खेळातील सहभागामुळे ती भविष्यातील चांगल्या आरोग्याची पायाभरणी असून, आरोग्यसाठी खेळाद्वारे केलेली गुंतवणूक एक निरोगी सुदृढ आयुष्य देते असे प्रतिपादन चंद्ररूप डाकले कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा. सुभाष देशमुख यांनी प्राइड अकॅडमीच्या शालेय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. पंचायत समितीच्या सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल अॅन्ड ज्युनि. कॉलेजमध्ये विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.
क्रीडा स्पर्धचे उद्धघाटन
ऑकलंड,न्यूझीलंड राष्ट्रकुल कॉमन वेल्थ पावर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल विजेते
प्रा.सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर मुरकुटे होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले की खेळाविषयी आपल्याकडे मार्गदर्शन मिळत नसून, त्यामुळे खेळासाठी लागणारे चांगले गुण व क्षमता असूनही येथील विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करू शकत नाही. त्याचप्रमाणे मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना खेळामध्ये संधी दिली जाऊन त्यांच्या शारीरिक विकासाकडे लक्ष देऊन त्यातील उनिवा दूर केल्या पाहिजेत. तसेच पालकांनी मुलांच्या आरोग्या बाबत जागरूक राहून काळजी घेतली पाहिजे. येथील चिमुकल्यां विद्यार्थ्यांची शिस्तप्रिय परेड पाहून भारावलो असून श्रीरामपूर तालुक्यातील शैक्षणिक वैभवात भर टाकण्याचे काम प्राईड अॅकेडमी करत आहे. या शाळेतून निश्चितच आदर्श विद्यार्थी निर्माण होतील असा विश्वास आहे.
अभ्यासासोबतच आपल्या जीवनात खेळाचेही महत्त्व विद्यार्थ्यांनी वाढवावे. खेळामुळे आपले आरोग्य सुधारते, ज्या प्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनात भौतिक सुख सुविधा ज्या प्रमाणात गरजेच्या असतात त्याच प्रमाणे आपले सुदृढ आरोग्य ही तितकेच महत्वाचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजे, खेळातून आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो. आजच्या काळात मुले मोबाईल फोनवर खेळ खेळताना दिसून येतात. ते खेळण्यापेक्षा मैदानावर या मैदानी खेळ खेळले पाहिजेत.त्यांनी परदेशात खेळाला फार महत्त्व आहे. खेळाडूंनी नेहमी चांगले प्रदर्शन करून राज्य व देशपातळीवर नाव कोरले पाहिजे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी स्विमिंग गोल्ड मेडल अक्षय शिंदे, नवनाथ टेकाळे, अण्णासाहेब पाटील, नानासाहेब जुन्धारे, डॉ. सर्जेराव सोळुंके ,नाना बडाख ,अरुण सोळुंके प्रा.कार्लस साठे, नयन गांधी ,अर्जुन राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे नाना जुन्धारे, डॉ. सोळुंके, नाना बडाख यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्या श्रीमती.प्रीती गोटे यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलनानंतर स्पर्धेचे उद्गघाटन होवून स्पर्धेत कब्बडी, खो-खो, रिले, रस्सीखेच, लांब उडी, उंच उडी, तसेच बेडूक उड्या, लिंबू चमचा, शर्यत, बॅकवॉकिंग, ब्रिक्सवॉकिंग असे खेळ घेतले गेले. कॉलेजचे
प्राचार्य सुरेश कोकणे यांनी आभार मानले.
विद्या लोखंडे ,शिंदे शांभवी व मेकडे जुई यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बापूसाहेब पिसाळ, क्रीडा शिक्षक ऋषिकेश शिरसाठ इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.