टाकळीभानची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
श्रीरामपुर विधान सभा व शिर्डी लोकसभा मतदार संघातील टाकळीभान येथील एका भागाची प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली. आँनलाईन पध्दतीने मतदाराच्या फोटो सह मतदार यादीत नावे आली आहे व या यादीत नविन नावे समाविष्ट करायची असेल व यादीतील काही नावातील दुरुस्ती असेल तर भाग क्रमांक १८४ मधिल मतदाराना जिल्हा प्राथमिक केद्र शाळा टाकळीभान मधिल सःबधीत शिक्षककांना भेटून आपली नावे यादीत समाविष्ट करुन घ्यावे असे आवाहान करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 09/11/2022 रोजी मतदार यादी भाग क्रमांक 184 – टाकळीभानची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली .
दिनांक 09/11/2022 ते 08/12/2022 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम सुरू राहणार आहे. या काळात नवीन मतदार नोंदणी, दावे-हरकती स्वीकारणे, आधार लिंक करणे इत्यादी कामे सुरू राहणार आहेत.तरी जास्तीत जास्त लोकांनी आपली नावे यादीत घालावे. यावेळी मतदार प्रारुप यादी प्रसिद्ध करताना पञकार दिलीप लोखंडे, पञकार नवले बापुसाहेब, अजिंक्य पटारे, अशोक सुलताने, शिक्षक पटारे सर, कानडे सर, अदी मान्यवर उपस्थीत होते.
प्रारुप यादी प्रसिध्द करताना पञकार दिलीप लोखंडे ,बापुसाहेब नवले,अजिंक्य पटारे कानडे सर पटारे सर
Rate this post