अॅड. अजितराव काळे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेची मिटिंग.
अॅड. अजितराव काळे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेची मिटिंग.
अहमदनगर :जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने पिक कर्जा बाबतच्या मागणी संदर्भात आज दिनांक ०५ आॅगष्ट वार शुक्रवार रोजी जिल्हा बँक व्यवस्थापण समिती यांच्यासमवेत अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेची मिटिंग झाली आहे. सदर बैठकीत अॅड.अजितराव काळे यांनी रिजर्व बँकेच्या सर्व गाईडलाइन बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्गदर्शक सूचनेचे पालन पिक कर्जवाटपाबाबत होत नसलेचे लिगल अधिकाऱ्याच्या अॅड. काळे यांनी लक्ष्यात आणून दिले अडचणी असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँक, मुख्य कार्यालय अहमदनगर येथे उपस्थित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष अॅड.अनिल औताडे ,युवराज पा.जगताप, इंद्रभान चोरमल, संजय पवार, बच्चू मोढवे, नारायण टेकाळे, साहेबराव चोरमल, अकबर शेख, अशोक पवार, गोरख पवार,अशोक टेकाळे, मच्छिद्र आव्हाड सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. १)पती पत्नी दोघांनाही ८-अ प्रमाणे स्वतंत्र पिक कर्ज मिळावे.
२)भोगवटादार वर्ग -२ला विना जामिन पिक कर्ज मिळावे.
3)सोसायटी बेबाकी असलेल्या व इतर बँका थकबाकी असलेल्या सभासदांना पिककर्ज मिळावे. ४)ऊस पिकासाठी विना कारखाने दाखले पिक कर्ज मिळावे यासह इतरही शेतकरी समस्येवर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन श्री.अॅड.माधवराव कानवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्या समवेत चर्चा झाली. याप्रसंगी बँक व्यवस्थापनाला शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
“`