गुन्हेगारी
बोल्हेगाव फाटा खून प्रकरणातील आरोपी १२ तासांत गजाआड

बोल्हेगाव फाटा खून प्रकरणातील आरोपी १२ तासांत गजाआड
अहिल्यानगर येथील बोल्हेगाव फाटा येथे अश्विन कांबळे या युवकाचा शुक्रवारी (ता. १०) रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले. भास्कर विठ्ठल देशमुख (वय २७, रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.
*खून केल्याची कबुली*
बोल्हेगाव फाटा येथे पोलिसांना शनिवारी (ता. ११) अश्विन कांबळेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अश्विनची पत्नी कल्पनाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला वेलतुरी (ता. आष्टी, जि. बीड) येथून जेरबंद केले. केल्याच्या रागातून दारूच्या नशेत अश्विनचा खून केल्याची कबुली भास्करने पोलिसांकडे दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली