केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी घेणार शनिदर्शन
केंद्रीय सहकार व गृहमंत्री . अमित शहा हे रविवारी शनिशिंगणापूर येथे शनी दर्शनाला येत आहेत. यानिमित्ताने आज शनिशिंगणापूर येथे जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिशिंगणापूर देवस्थान आणि सर्व विभागाच्या अधिकारी वर्गाची दौरा नियोजनाची आढावा बैठक घेतली. यावेळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
घोडेगाव येथील हेलिपॅड वर नाम. अमित शहा यांचे आगमन होईल. यानंतर ते शनिशिंगाणापूर येथे शनी दर्शन घेऊन अभिषेक करणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. या दौरा नियोजना बाबत आज नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिशिंगणापूर येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी आ. विठ्ठलराव लंघे, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाघ ज्ञानेश्वर पेचे, प्रताप चिंधे, ऋषिकेश शेटे, तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन दरंदले, पोलीस पाटील सयाराम बानकार, नेवासा भाजपा शहर प्रमुख मनोज पारखे, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जे. के दरंदले, नितीन शेटे तसेच पत्रकार बांधव