छावा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप दरंदले यांची निवड.

छावा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप दरंदले यांची निवड.
सोनई-महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे आधारवड छञपती खा.संभाजीराजे,छावा प्रमुख धनजंय जाधव तसेच छावा संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख सुमित दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली छावा संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप दरंदले निवड करण्यात आली.छावा संघटनेची ध्येयधोरणे व तळगाळात संघटना वाढवण्यासाठी तसेच समाजातील गोरगरीब वंचित शेतकरी कष्टकरी महिला व बाराबलुतेदार घटकाची सेवा व त्यांचे प्रश्न विविध सोडवण्यासाठी छावा संघटना राज्यात काम करते.छञपती शाहु महाराजांचे वशंज युवराज खा.संभाजीराजे छञपती यांच्या मार्गदर्शनाखाली छावा संघटना काम करते.सोनई येथील मराठा आरक्षण चळवळीत काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते संदिप दरंदले यांच्या कार्याची दखल घेवुन छावा संघटनेने जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली असुन त्यांच्या निवडी बद्दल अहमदनगर जिल्हा व नेवासा तालुक्यातुन मान्यवराकडुन अभिनंदन होत आहे.जिल्हात छावा संघटनावाढी व विविध समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढील काळात शाखा स्थापन करणार आहे.यासाठी सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी संदिप दरंदले यांच्याशी 9850594609 संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.