हिंदू धर्माचे पूजनीय दैवत असलेली गौमातेचे वांगी खुर्द येथे दशक्रिया विधी व प्रथम पुण्यस्मरण.

हिंदू धर्माचे पूजनीय दैवत असलेली गौमातेचे वांगी खुर्द येथे दशक्रिया विधी व प्रथम पुण्यस्मरण.
वांगी खुर्द येथील बाळासाहेब कदम या शेतकऱ्याच्या इथे लक्ष्मी नावाची गौमाता होती हिंदू धर्मासाठी पवित्र असणारी त्यांची लाडाकी गावरान जातीची गाय या मातेच्या दुधाला न विसरणारा माणूस वांगी खुर्द येथील बाळासाहेब कदम यांच्या रूपाने पाहण्यास मिळाला आहे बाळासाहेब हे लहान शेतकरी असून त्यांचा मेंढी पालन हा व्यवसाय आहे ज्यावेळेस कदम आपल्या मेंढ्या घेऊन रानात चारण्याजात असत त्यावेळी ही लक्ष्मी नावाची गाय त्यांच्यासोबत मेंढ्यांबरोबर रानात चरायला जात असे कदम कुटुंबीयांची अतिशय लाडाची लक्ष्मी मयत झाल्यानंतर त्यांनी तिचे श्राद्ध मोठ्या दिमाखात घातले होते त्याचप्रमाणे तिला जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे याचे औचित्य साधून बाळासाहेब यांनी आज २५/७/२०२२ रोजी तिचे वर्ष श्राद्ध (प्रथम पुण्यस्मरण) मोठ्या थाटामाटात घातले या पुण्यस्मरण निमित्त ह भ प ऋषिकेश महाराज कांगणे यांच्या वाणीतून किर्तन रुपी सेवा तसेच गोमातेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गौ मातेवर विशेष श्रद्धा असल्याकारणाने बाळासाहेब कदम कुटुंब याचे पंच्य क्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे या कार्यक्रमानिमित्त वांगी खुर्द वांगी बुद्रुक तसेच पंचक्रोशातील गौ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते