सुजाता स्कुल मध्ये पतंग उत्सव साजरा*_

_*सुजाता स्कुल मध्ये पतंग उत्सव साजरा*_
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई (16 जानेवारी):सुजाता स्कूलमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पर्यावरणपूरक पतंग उत्सव साजरा करण्यात आला.
मकरसंक्रांत हा माधुर्य आणि स्नेह वृद्धींगत करणारा सण असून या पर्वावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिळगूळ वाटप करून पतंगबाजीचा आनंद लुटला जातो.परंतु अलिकडे घातक (kite flying) अशा नॉयलान मांजाचा वापर पंतग उडविण्यासाठी केला जात असल्याने पशुपक्षी व मानवालाही त्यापासून धोका निर्माण झाला आहे. तसेच प्लास्टिक पंतगापासून पर्यावरणाचे प्रदूषणही वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर सुजाता स्कुल चे संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणस्नेही पंतग उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात 1ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. प्रसंगी रंगबिरंगी कागदी पतंग, साधा धागा, चक्री घेवून चिमुकली मुलं शाळेत दाखल झाली होती. त्यांनी मोठ्या उत्साहाने पतंग उडविण्याचा आनंद लुटला.तत्पुर्वी प्रमुख पाहुणे संस्थापक श्री किरण सोनवणे सर , शाळेतील शिक्षक बाळकुमार डमाळे ,संध्या गायकवाड सुजाता दरंदले ,व किसन पुंड सर यांनी विद्यार्थ्यांना मकरसंक्रांतीचे वैज्ञानिक, शास्त्रीय व धार्मिक दृष्टीकोनातून महत्व सांगितले. तसेच घरीसुद्धा मोठया व्यक्तींना नॉयलान मांजा व प्लास्टिक पतंगाचा वापर न करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. तसेच पतंग उडविताना पशू, पक्षी, मानवास कोणतीही इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घ्यावी व तसेच कापलेले पंतग पकडण्यासाठी अपघात व धोका होण्याची शक्यता असल्याने पतंगांच्या मागे धावणे टाळण्यास सांगितले. कार्यक्रमाची सांगता तिळगुळ वाटप करून झाली तर विद्यार्थ्यांनी तिळगुळ घ्या आणि कायमच एकमेकांशी गोड बोलत राहा असा संदेश भाषणांतून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा तोडमल यांनी केले तर सविता जाधव यांनी आभार मांडले या महोत्सवाकरिता शाळेतील शिक्षक वआदींनी विशेष परिश्रम घेतले.