३० वे आदिवासी एकता परिषद ठरले लक्ष वेधी.

३० वे आदिवासी एकता परिषद ठरले लक्ष वेधी.
आदिवासी एकता परीषदच्या वतिने दर वर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी एकता सांस्कृतिक महासमेलन घेतली जातात या वर्षी देखील गुजरात राज्यातील हमिरपुर तालुका कवट जिल्हा छोटा उदयपुर या ठिकाणी ३० वे आदिवासी सांस्कृतिक महासमेलन २०२३ घेण्यात आले १३ .१४.व १५ या तिन दिवस चाललेल्या अधिवेशनात वेगवेगळ्या आदिवासी समाजातील सुमारे १५ लाख आदिवासी समाजातील लोकांनी हजेरी लावली आदिवासी सांस्कृतिक महासमेलन या कार्यक्रमाला पहिल्यांदा एवढा आदिवासी समुदाय उपस्थित राहील्यामुळे हे महासमेलन लक्ष वेधी ठरले या संमेलनात आदिवासी सांस्कृतिची माहिती आदिवासी एकता परिषद आणि आदिवासींवर होणार विवीध अन्याय अत्याचार यावर चर्चा करण्यासाठी तसेच वैचारिक मंथन करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने ३० वे महासमेलन घेण्यात आले या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलना साठी देशभरातील हजारो आदिवासी प्रतिनिधी सामाजिक राजकीय नेते संमेलनासाठी दाखल झाले होते आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन निसर्ग पुजक परंपरा बोली भाषा कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच आदिवासींच्या जनसमुदायाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी तसेच विविध विषयांवर चर्चा त्याच प्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जिवन शैली पारंपारिक अवजारे खाद्य पदार्थ सांस्कृतिक दर्शन घडविण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाच्या माध्यमातून आदिवासी रुढी परंपरा संस्कृती समजुन घेण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील आदिवासी एकता परिषदचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष देवीदास पवार जेष्ठ कार्यकर्ते कैलास माळी संजु गांगुर्डे महिला अध्यक्षा नंदाताई माळी तसेच मोठ्या संख्येने आदिवासी कार्यकर्ते महा संमेलनासाठी उपस्थित होते