महाराष्ट्र

पत्रकरांच्या प्रश्नी सतत प्रयत्नशील राहणार – खा. सुजय विखे पा., राहुरीत पत्रकरांचा सन्मान 

पत्रकरांच्या प्रश्नी सतत प्रयत्नशील राहणार – खा. सुजय विखे पा., राहुरीत पत्रकरांचा सन्मान 

 

 

 

 

तालुक्यातील पत्रकारांचे वास्तववादी लिखाण नेहमीच दिशादर्शक राहीले आहे विविध अंगाने येथील पत्रकारांनी पत्रकारीता जोपासली व वाढवली चुकीच्या व प्लांटेड बातम्या येथील पत्रकारांनी दिल्या नाहीत त्यामुळे राहुरी तालुक्यातील पत्रकारीता इतर भागाच्या तुलनेत वरच्या क्रमांकाची राहिली आहे तो वसा आगामी काळात जपला जाईल ही खात्री आहे तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नी मी तुमच्याबरोबर असून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे अहमदनगर दक्षिणचे खा. सुजय विखे पा. म्हणाले 

   राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा मुळा धरणावर त्यांनी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्ता पा. ढुस, तानाजी धसाळ, साईनाथ कोळसे, आर. आर. तनपुरे, शिवाजी डौले, महेश पाटील, नंदकुमार डोळस आदी उपस्थित होते 

   प्रसंगी पत्रकारांचा पुष्पगुच्छ, शाल, दैनंदिनी, पेन व आधुनिक काळात पत्रकारांना उपयोगात येइल अशा मोबाईल पाॅवरबॅकसह इतर वस्त भेट देत यथोचित सन्मान करण्यात आला 

   पुढे बोलताना खा. विखे म्हणाले चांगल्या कामाचा उल्लेख सद्यस्थितीत होत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रतिमा समाजात चांगली जात नाही चुकलं तर निश्चितच पत्रकारांनी जागा दाखवायला हवी मात्र चांगल्या कामाचे योग्य मुल्यमापन लावत कौतुकही व्हायला हवे सामाजिक माध्यमांमुळे म्हणा अथवा अन्य कारणामुळे समाजातील वैचेरिकता संपत चालली आहे ती संपू न देण्याची महत्त्वाची जबाबदारी ही पत्रकारांवर आली आहे पत्रकारांनी सामाजिक प्रश्न मांडायला हवेत जेणेकरून लोकप्रतिनिधींच्या ते नजरेत येतील व त्यावर लक्ष केंद्रित करता येईल बरोबरच खर बोललं तर त्याचा विपर्यास होतो माझ्या मते सत्य बोलणारा लोकप्रतिनिधी हवा परंतू पत्रकारांनीही त्याला वेगळं रूप न देता प्रतिसाद देणं अपेक्षित आहे लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी ती गरज असल्याचेही ते म्हणाले 

   माजी मंत्री कर्डीले आपल्या शुभेच्छा संबोधनात म्हणाले पत्रकारांशी निरंतर संवाद साधून निर्णय घेण्याची परंपरा विखे घराण्याने पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांपासून जपली व जोपासली आहे त्यामुळे विखे घराणं व पत्रकार हे अविभाज्य नातं आजही खा. विखेंच्या रूपाने वाढीस लागलं आहे विकासाला गती मिळण्यासाठीच महत्त्वाचे काम पत्रकार लक्षात आणून देतात त्यामुळेच विकासात्मक कामे पूर्णत्वाकडे जात आहेत 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड व साईनाथ कदम व आप्पा ढोकणे यांनी केले 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे