पुढील वर्षी पत्रकार दिनी क्रीडा महोत्सव भरविनार… रवींद्र गाढे,

पुढील वर्षी पत्रकार दिनी क्रीडा महोत्सव भरविनार… रवींद्र गाढे,
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथे पुढील वर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनी विविध खेळांचे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन आझाद क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक रवींद्र गाढे यांनी केले.
आझाद क्रीडा मंडळ व विक्रांत स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने पत्रकार दिन सप्ताह निमित्त टाकळीभान पत्रकारांचा सन्मान गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव सुनील गाडेकर होते. बोलताना गाढे पुढे म्हणाले की पत्रकारांचे खेळाडूंना मोठे प्रोत्साहन असून ते वेळोवेळी खेळामध्ये प्रावीण्य व यशस्वी खेळाडूंना प्रसिद्धी देतात, त्यामुळे खेळाडूसह येथील गावाचे नाव उंचावले जाऊन गावची एक खेळाबद्दल विशिष्ट ओळख निर्माण झाली आहे. तसेच गावच्या सर्वांगीण विकासामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे गाढे म्हणाले. याप्रसंगी सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा मंडळ व खेळाडूंचे पत्रकार बापूसाहेब नवले व पत्रकार अर्जुन राऊत यांनी मार्गदर्शन करून आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी पो.काॅ,प्रशांत रणनवरे,ज्येष्ठ खेळाडू भाऊराव सुडके, हेमंत पटारे, गड्डीवार सर , रमेश गाढे,अक्षय थोरात आझाद क्रीडा मंडळ व विक्रांत स्पोर्ट्स क्लब सह टाकळीभानचे सर्व खेळाडू यावेळी उपस्थित होते.