आझाद क्रीडा मंडळ खेळाडूंची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कबड्डी संघामध्ये निवड,

टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ खेळाडूंची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कबड्डी संघामध्ये निवड,
राजभवन आयोजित अश्वमेध क्रीडा महोत्सव सन २०२३-२४ दि. ०३ ते ०७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, लोणेरे जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर क्रीडा महोत्सवात टाकळीभानचे भूमिपुत्र युवा कबड्डी खेळाडू गणेश रणनवरे व संचित शिंदे या खेळाडूंची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कबड्डी संघा मध्ये निवड झाली आहे.
या खेळाडूंनी अंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या संघात त्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे आ.लहुजी कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश अदिक, मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन पवार, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य किरणराव धुमाळ, अल्ताफ शेख ,क्रीडा मार्गदर्शक रवींद्र गाढे,अक्षय थोरात ,आझाद क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू व टाकळीभान येथील क्रीडाप्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.