कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु सोसायटीच्या चेअरमन पदी सचिन भवर तर व्हाइस चेअरमन सुधीर आरडे यांची निवड
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु सोसायटीच्या चेअरमन पदी सचिन भवर तर व्हाइस चेअरमन सुधीर आरडे यांची निवड
कर्जत प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील महत्त्वाची समजली जाणार्या सेवा सोसायटीची निवडणुक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र भोसले डॉक्टर संजय भोसले तसेच विजय भोसले व विष्णू शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक श्री समर्थ सद्गुरु गोविंद महाराज ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून लढविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत श्री समर्थ सद्गुरु गोविंद महाराज ग्राम विकास पॅनल ने घोगवीत यश मिळवून संस्थेवर विजय प्राप्त केला होता. तर आज रोजी या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदी सचिन भवर यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुधीर आरडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवळीवेळी सर्वच्या सर्व सदस्य उपस्थित होते. यात अतुल शेंडकर, बबन (दादा) शेंडकर, पोपट (बापू) शेंडकर, हनुमंत भोसले, धनंजय आरडे, नवनाथ राऊत, शहाजी जाधव, किरण धावडे, पंढरीनाथ कौचाळे, सुलोचना गोरे, काशीबाई जाधव, आदी सदस्य या निवडी वेळी उपस्थित होते. यावेळी नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन तसेच सर्व सदस्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र भोसले तसेच भाजपाचे नेते दादासाहेब सोनमाळी व काकासाहेब धांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी गोरे, नानासाहेब पवार, पोपट जाधव, महादेव भवर, इन्नुस आतार, पिंटू भवर, सुधीर भवर, राजेंद्र पवार, विलास शेंडकर, भाऊसाहेब शिंदे, राजू भोसले, सागर भवर, विकास शिंदे आधी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी गुलालाची उधळण करत नूतन चेअरमन व चेअरमन तसेच सर्व सदस्यांचे अभिनंदन केले