२४ डिसेंबर २०२१ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंडियन ओव्हरसीस बॅंकेचे मॅनेजर श्री.धनविजय चरथाल होते.

शिक्षक-पालक मेळाव्याचे औचित्य साधून शाळेचे संस्थापक श्री.बाळासाहेब तोरणे सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.ॲन्थनी आवारे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या उन्नतीविषयी विचार मांडले.त्यानंतर शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली.भेर्डापूर येथील श्री.सदाशिव विठ्ठल गवळी यांची शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षपदी निवड केली.अध्यक्ष निवडीनंतर विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा हिवाळे मॅडम यांनी केले.तर शुभांगी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.