बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणारा आरोपी घोडेगाव येथे एलसीबी कडून जेरबंद एलसीबी, ची दमदार कारवाई

बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणारा आरोपी घोडेगाव येथे एलसीबी कडून जेरबंद
एलसीबी, ची दमदार कारवाई
३०/०१/२०२२ रोजी श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, घोडेगांव, ता. नेवासा येथे येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी नेवासा परिसरात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि.सोमनाथ दिवटे, पोहेकॉ. मनोहर गोसावी, पोना.ज्ञानेश्वर शिंदे ,संदिप घोडके, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, पोकॉ / सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने व चापोहेकॉ. बबन बेरड अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, घोडेगांव, ता. नेवासा येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच एक इसम कृषी उत्पन्न बाजार समिती गेट समोर येवून सदर ठिकाणी थांबून संशईत नजरेने इकडे तिकडे पाहू लागला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याला घेराव घालून त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १ ) सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापुर, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण २६,००० /- रु.किं. गावठी कट्टा व दोन — जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापुर, ता. नेवासा हा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना / १८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३५ / २०२२, आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहेत. हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणे स .दरोडा, दुखापत करणे व घातकशस्त्रे बाळगणे व विक्री असे एकुण गंभीर स्वरुपाचे ०३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. १) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३ / २०१२ भादविक ३२३, ५०४, ५०६ मपोकाक ३७ (१) (३), १३५२ ) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. २ /२०१६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५, ७ पोलीस स्टेशन जिल्हा बीड गु.र.नं. ७९ / २०२१ भादविक ३९५, ४१२, १२० (ब) ,इ गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हि कारवाई केली आहे.
प्रतिनिधी सोनई
मोहन शेगर,