चालक पदी कार्यरत असलेले भाऊसाहेब बनकर यांची सेवा कार्यकाल पूर्ण

येथील श्रीरामपूर एसटी महामंडळ चे चालक पदी कार्यरत असलेले भाऊसाहेब बनकर यांची सेवा कार्यकाल पूर्ण झाला असता सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी एस टी महामंडळ चे श्रीरामपूर डेपो मॅनेजर शिवदे साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक लटपटे साहेब, एस टी महामंडळ श्रीरामपूर आगाराचे आजी माजी कर्मचारी सर्व स्टाफ उपस्थित होता. यावेळी शिवदे साहेब बोलताना म्हणाले की भाऊसाहेब बनकर यांनी आपली उत्कृष्ट सेवा पूर्ण केली असून त्यांची ड्युटी च्या बाबतीत कसलीही तक्रार नसे. त्यांची सर्व कर्मचाऱ्यां प्रती वागणूक आदर सन्मानाची होती. तसेच यावेळी लटपटे साहेब बोलताना म्हणाले की भाऊसाहेब बनकर यांच्या सारखे कर्मचारी एसटी महामंडळ खात्यास मिळणे दुर्मिळ असून ते भाग्याचे होते. आणि त्यांनी आपला कार्यकाळ अतिशय चांगली सेवा पूर्ण करून पार पाडला. याप्रसंगी कार्यशाळा अधीक्षक गायकवाड, स्थानक प्रमुख किरण शिंदे, एसटी बँकेचे शाखाधिकारी पालवे ,एसटी महामंडळाचे माजी कर्मचारी बाबासाहेब तनपुरे, श्रीधर गाडे, अकोदे, इंगळे , खंडेराव गायकवाड, बबनराव पाबळे, जगन्नाथ बनकर,अमोल पटारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, आरपीआयचे सुरेंद्र भाऊ थोरात ,भीमा भाऊ बागुल, भाजपचे मुकुंद हापसे, रावसाहेब मगर, ऋषीराज हापसे, गणेश वखरे, डॉ.प्रसाद भालेराव,पोपटराव बनकर, भाऊसाहेब बनकर, डायवर संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन बनकर ,विकास बनकर ,अनिल बनकर व बनकर परिवार उपस्थित होता. यावेळी महामंडळाचे आजी-माजी कर्मचारी व ग्रामस्थ यांनी त्यांचा सेवा निवृत्ती बद्दल सत्कार केला. सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले.